Shirdi Lok Sabha Election 2024 Result : शिर्डीत ठाकरेंची मशाल धगधगणार; लोखंडेकडून धनुष्यबाण काढून घेणार

Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे पिछाडीवर असून, ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे 30 हजार मतांनी आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिलेदाराची हॅटट्रिक शिर्डीकर हुकवताना दिसत आहे.
Bhausaheb Wakchaure Sadashiv Lokhande
Bhausaheb Wakchaure Sadashiv Lokhandesarkarnama
Published on
Updated on

Shirdi : शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डीत धनुष्यबाण पेलवताना दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कडवी झुंज देत रोखताना दिसत आहे. खासदार लोखंडे पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असल्याने शिर्डीतील महायुती कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. शिर्डीकरांनी लोखंडेच्या हातून धनुष्यबाण काढून घेत मशाल धगधगवणार, असे दिसते आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचे (Shiv Sena) डझनभर नेते मैदानात उतरले होते. अर्धा डझन मंत्री प्रचारात होते. पैसाचा धूर झाला होता. शिर्डीतील जागा मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रचारात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये प्रचारसभा घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांना समोर बोलावून घेत निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सदाशिव लोखंडे शिवसेनेचा धनुष्यबाण पेलवून हॅटट्रिक करणार असे संकेत होते.

या तुलनेत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे कोठेच नव्हते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन मतदारसंघातील वातावरण पूर्ण बदलवून टाकले. या मतदारसंघात जातीचे गणित महत्त्वाचे होते. ते आखण्यात ठाकरे यांनी यशस्वी कला साधली. भाऊसाहेब वाकचौरे खासदार असताना त्यांनी गेलेला जनसंपर्क ते संभाळून होते.

तुलनेत सदाशिव लोखंडे दोन वेळा खासदार असून मतदारसंघात कोठेच नव्हते. याच गोष्टीचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळताना दिसतो आहे. याशिवाय या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे विधानसभा मतदारसंघ येतात. या दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मंत्री विखे पुत्रासाठी नगर दक्षिणमध्ये गुंतून पडले असतानाच आमदार थोरातांनी महाविकास आघाडीला शिर्डीत बळ दिले. वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांची एन्ट्री महायुतीला फटका देणारी ठरल्याचे दिसते

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhausaheb Wakchaure Sadashiv Lokhande
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : विखे-लंके लढतीचा एक्झिट पोल काही असो, पण मोठे विखे निकाल पलटवणार?

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाऊसाहेब वाकचौरे यांना लीड मिळताना दिसतो आहे. पाचव्या फेरीनंतर हा लीड जवळपास 30 हजारापर्यंत गेला होता. ठाकरेंविरोधात बंडखोरी केल्याचे शिर्डीकरांना आवडलेले दिसत नाही. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्या हातातील धनुष्यबाण शिर्डीकरांना काढून घेल्याचे दिसते. शिर्डीत मशाल धगधगणार असेच दिसते आहे.

Bhausaheb Wakchaure Sadashiv Lokhande
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : विखे-लंके लढतीचा एक्झिट पोल काही असो, पण मोठे विखे निकाल पलटवणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com