Sadashiv Lokhande V/S Bhausaheb Vakchoure : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' साईंचा दरबार उजळवणार, असे दिसते आहे. एक्झिट पोलनुसार शिर्डीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे पराभवाच्या छायेत असून, शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विजयी होताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना (Shiv Sena), अशी लढत असतानाच वंचित बहुजन पक्षाने एन्ट्री घेतली. वंचितकडून उत्कर्षा रुपवते निवडणुकीच्या रिंगणात आल्या. त्यामुळे मतदारसंघात निवडणुकीची त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. उत्कर्षा रुपवते काँग्रेसमध्ये होत्या. परंतु त्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसचा 'हात' सोडून वंचित बरोबर गेल्या. उत्कर्षा यांनी देखील निवडणुकीत चांगला जोर लावला. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाने दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला होता. असे असले तरी एक्झिट पोलने शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवारी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बाजूने कौल दिला आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे शिर्डीत निष्ठावान शिवसैनिक नाराज होते. यातच सदाशिव लोखंडे मतदारसंघात दिसत नसल्याची तक्रारी होत होत्या. खुद्द शिवसेनेतून तशा तक्रारी होत्या. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध झाला. भाजपने देखील सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची करत जागा ताब्यात ठेवली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीची जागा ताब्यात ठेवत असतानाच, त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी यांनी मोठे आव्हान उभे केले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उभे केले. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हातात मशाल दिली. जुन्या शिवसैनिकांनी सुरूवातीला उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली. पंरतु ठाकरे यांनी ती दूर करत एक दिलाने काम करा, असा आदेश देत काही शब्द दिले. त्यानुसार शिर्डीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केले. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, लहू कानडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
महाविकास आघाडीतील नेते एकदिलाने काम करत असतानाच महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकहाती तंबू राखला. महायुतीच्या छताखाली सर्व विरोधकांना एकत्र केले. यात कितपत यश आले ते, निकालाच्या दिवशी दिसेल. परंतु एक्झिट पोलमध्ये मात्र ठाकरेंची माशल साईचा दरबार उजळवताना दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.