Nashik MSRTC News: महिनाभरात २१ लाख महिलांकडून अर्ध्या टिकिटाचा लाभ!

21 lac Women Took Benefit of MSRTC Half Ticket Facilities: राज्य परिवहन महामंडळाच्या अर्ध्या तिकीटाचा लाभ घेण्यात नाशिकच्या महिला आघाडीवर
MSRTC Bus & CM Eknath Shinde
MSRTC Bus & CM Eknath Shinde Sarkarnama

Nashik Womens News: राज्यात महिलांना बस प्रवासासाठी अर्ध्या तिकिटाची सेवा सुरु झाली. त्याचा गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील २१ लाख महिलांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील कळवण डेपो अव्वल असून शेवटचा क्रमांक पेठ डेपोचा आहे. विद्यमान एकनाथ शिंदे सरकारचा हा निर्णय महिलांना भावल्याचे चित्र आहे. (Womens enjoying half ticket benefit of MSRTC)

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) महिलांना (Womens) एसटीच्या (MSRTC) तिकीटात पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती. त्याचा राज्यातील महिलांना लाभ घेतला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महिला त्यात आघाडीवर आहेत.

MSRTC Bus & CM Eknath Shinde
Nashik APMC election : पिंगळे समर्थकांच्या सात संस्था मतदानास अपात्र!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या अर्ध्या टिकीटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील एकवीस लाख महिला लाभार्थींचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असून हे मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे यश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

राज्यातील महिलांचा एस.टी प्रवास कमीत कमी टिकीट दरात व्हावा अशी मागणी होती. महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांना टिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील महिला वर्गाकडून जोरदार स्वागत झाले. गेल्या महिन्यात १७ मार्चपासून एस.टी प्रवासासाठी महिलांना अर्ध्या टिकीट योजना सुरू करण्यात आली होती.

MSRTC Bus & CM Eknath Shinde
Uddhav Thackeray news : शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग!

महिन्याभरात या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१ लाख महिला प्रवाशांना झाल्याचे समोर आले आहे.सर्वाधिक लाभ कळवण डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला असून त्या खालोखाल सिन्नर डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्धे टिकीट योजनेमुळे महिन्याभरात जिल्ह्यातील महिलांचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असे खासदार गोडसे यांनी सांगितले.

डेपोनिहाय महिला प्रवाशी

जिल्ह्यातील विविध डेपोंतील बसने प्रवास केलेल्या महिला प्रवाश्यांची संख्या अशी, नाशिक एक - ११८९०७, नाशिक दोन - २२०५४५, मालेगांव - १८८७३४, मनमाड - ९५८१७, सटाणा - २३७१११, सिन्नर - २२७८८६, नांदगाव - १४९१५७, इगतपुरी - १०४२५५, लासलगांव - १४२१४७, कळवण - २७२७६५, पेठ - ९५९३५, येवला - १०७१२०, पिंपळगांव - १४५५९२.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com