Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना घेरण्याचा डाव; शैक्षणिक व सहकारी संस्थांवरील छाप्यात काय सापडलं...

Nashik Teacher Vidhan Parishad Constituency Election : कोपरगावमधील 'संजीवनी'चे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरले आहेत. या मतदारसंघाचे किशोर दराडे प्रतिनिधित्व करत आहेत. यातून कोल्हे-दराडे यांच्यात खुर्चीसाठी संघर्ष निर्माण झाला आहे.
Vivek Kolhe
Vivek Kolhesarkarnama

Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामधील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्याविरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत. विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून छापे टाकले गेले.

नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान कोल्हे यांच्या शैक्षणिक संस्थावरील ही छापेमारी चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रातील भाजप सरकारने विरोधकांना 'नामोहरण' करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप होत आहे. केंद्र सरकारने विरोधकांबाबत केलेल्या प्रकाराचा कित्ता राज्य सरकारने विवेक कोल्हे यांच्याबाबत गिरवल्याची चर्चा आहे.

विवेक कोल्हे यांच्या मातुश्री स्नेहलता कोल्हे या भाजपच्या (BJP) नेत्या आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील त्या माजी आमदार आहेत. विवेक कोल्हे यांच्याकडे युवा नेता म्हणून पाहिले जाते. कोल्हे परिवाराचा सहकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विस्तार आहे. कोल्हे आणि विखे परिवारांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यातून कोपरगावमधील 'संजीवनी'चे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरले आहेत.

या मतदारसंघाचे किशोर दराडे प्रतिनिधित्व करत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार दराडे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संदीप गुळवे यांना बळ दिले आहे. असे असले तरी सत्ताधारी आमदार दराडे यांनी अपक्ष उमेदवार कोल्हे यांचा धसका घेतला आहे. यातून कोल्हे-दराडे संघर्ष निर्माण झाला आहे.

Vivek Kolhe
Kishor Darade : त्या बेपत्ता उमेदवाराची माघार, दबाव तंत्र की ऐच्छिक?

नाशिक (Nashik) शिक्षक विधान परिषदेच्या मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याचदरम्यान विवेक कोल्हे यांच्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून छापे घातले घेतले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संभाजीनगर, पुणे, सोलापूर येथील पथकाने हे छापे घातले. तीन जूनपासून आतापर्यंत तीन वेळा पथकाने हे छापे घातले गेले आहेत. मात्र पथकाने छाप्यांमध्ये अजूनतरी काही सापडले नसल्याची माहिती समोर येत आहे.

Vivek Kolhe
Kishore Darade : शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार दराडेंविरुद्ध दाखल गुन्ह्यांची चर्चा; हरकत अन्...

विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या संस्थांवर ही छापे म्हणजे, सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे कोल्हे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. आमदार किशोर दराडे यांना कोल्हे यांनी आव्हान निर्माण केल्याने सत्ताधाऱ्यांकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले गेले. आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या शिक्षकाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावरून नाशिक आयुक्तालयामध्ये चांगलाच ड्रामा रंगला होता. नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीला धक्काबुक्की झाली होती. त्यावेळी विवेक कोल्हे यांनी आमदार दराडे यांच्यासह तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सुनावले होते.

पुढे नामसाधर्म्य असलेली ही व्यक्त बेपत्ता झाली. काल आयुक्तालयात येऊन स्वखुशीने अर्ज मागे घेत असल्याचे सांगून निघून गेली. मात्र आमदार किशोर दराडे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे यांना घेरण्यासाठी त्यांच्याशी निगडीत असलेल्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही पथकाने छाप्यात काय आढळले हे अजून स्पष्ट केलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com