Dhule Politics : धुळ्यातही भाजपविरोधात ‘इंडिया’ गटाची आक्रमक एकजूट!

`INDIA` front leaders took a meeting against BJP-जिल्हा पातळीवर ‘इंडिया गटा’ची प्रथमच बैठक झाल्याने नेते, पदाधिकाऱ्यांत मोठा उत्साह होता.
Political meeting in Dhule
Political meeting in DhuleSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : धुळे जिल्ह्यातील सत्तास्थाने काबीज केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याची प्रतिक्रीया काल `इंडिया` आघाडीच्या बैठकीत उमटली. भाजप विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. (Opposition parties of BJP will firm on agitaion in Dhule)

भाजप (BJP) विरोधातील शिवसेनेसह (Shivsena) विविध राजकीय पक्षांनी भाजपच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. याबाबत लवकरच महापालिकेवर (Dhule City) मोर्चा काढण्यात येणार आहे.

Political meeting in Dhule
Bacchu Kadu यांचे Aditya Thackeray यांना चॅलेंज, पुरावे द्या |Shivsena |CM Eknath Shinde |Sarkarnama

देशात व राज्यात `इंडिया` आघाडीची जमवाजमव सुरू असताना धुळे शहरात देखील उत्साह आहे. महाराष्ट्रात स्थानिक जिल्हा पातळीवर प्रथमच इंडिया गटाची बैठक झाल्याचा दावाही गटातर्फे करण्यात आला.

आपापसातील मतभेद विसरून भाजपच्या भ्रष्टाचारी व हुकूमशाहीविरोधात एकत्रित लढू, जिल्ह्यातील सर्व निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवू, असा निर्णय तथा निर्धार स्थानिक पातळीवर ‘इंडिया’ गट तथा महाविकास आघाडीने बैठकीत केला. धुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Political meeting in Dhule
Nashik News : शेतकऱ्यांचे टोमॅटो घेऊन पसार झालेल्या व्यापाऱ्याला सभापतींनी शिकवला धडा!

धुळे जिल्हा पातळीवरील इंडिया गट तथा महाविकास आघाडीची बैठक १५ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या देवपूर भागातील कार्यालयात झाली. शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. श्री. भोसले यांनी प्रास्ताविक केले.

बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. भाजपच्या एकाधिकार, हुकूमशाही व भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढणे, जिल्हा व तालुका पातळीवर ‘इंडिया’ गटाची बांधणी करून बैठका घेणे, जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुका, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, सहकारी निवडणुका एकत्रित लढविणे, सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व पक्षांची एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील व्यापक स्वरूपाची बैठक घेण्याचेही ठरले.

Political meeting in Dhule
Malegaon News : मतदारसंघाताल दुष्काळाने पालकमंत्री दादा भुसे अडचणीत?

आमदार पाटलांकडे नेतृत्व

बैठकीत धुळे जिल्हा इंडिया गटाचे नेतृत्व आमदार कुणाल पाटील यांनी करावे, असा प्रस्ताव शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी यांनी ठेवला. तसेच इंडिया गटातील सर्व पक्षांतर्फे धुळे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट मोर्चा काढण्याचेही ठरले. बैठकीत आपापल्या पक्षाची भूमिका पदाधिकारी, प्रतिनिधींनी मांडली. आपापसातील मतभेद विसरून समन्वय साधण्याचे ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com