Nashik: महापालिकेत काम न करताच सहीसाठी मागितली लाच!

नाशिक रोड पोलिस ठाण्यात महापालिकेच्या मुकादम, निरीक्षकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
ACB action against NMC
ACB action against NMCSarkarnama

नाशिक : काम न करताच रजिस्टरमध्ये सही करण्याच्या मोबदल्यात लाच (Bribe) मागितल्याच्या तक्रारीची (Cpmplain) खातर जमा करून लाचलूचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने नाशिक रोड महापालिका (NMC) विभागीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) व मुकादम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (ACB file fir against sanitary inspector of NMC)

ACB action against NMC
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

या संदर्भात एका महिलेने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यात राजू देवराम निरभवणे व मुकादम बाळू दशरथ जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर विभागीय स्वच्छता निरीक्षक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ACB action against NMC
Rohit Pawar: शासकीय यंत्रणाचा गैरवापरातून लोकशाहीची पायमल्ली!

महिला तक्रारदार यांची महानगरपालिकेचे नेमून दिलेले काम न करता, हजेरी मस्टरवर सही करण्याचे व उशीर झाल्यास खाडे न पकडण्याचे मोबदल्यात सात हजार रुपयांची पंच साक्षीदार यांचे समक्ष मागणी केली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. या सापळ्यात पंचांसह डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला होता.

दरम्यान दोघांना ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, निरीक्षक संदीप घुगे, शरद हेंबाडे, राजेंद्र गिते, एकनाथ बाविस्कर, हवालदार संतोष गांगुर्डे, परशराम जाधव यांच्या पथकाने केली.

या घोटाळ्याची व्याप्ती सध्या नाशिक महानगरपालिकेच्या चारही विभागातील कार्यालयात पसरलेली असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे मनपाच्या इतर विभागांची ही आम्ही चौकशी करणार आहोत. या संदर्भात तक्रारदारांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- वैशाली पाटील, पोलिस उपअधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com