Opposition Parties Meeting : उद्धव, आदित्य ठाकरेंनी घेतली 'इंडिया'च्या तिसऱ्या बैठकीची जबाबदारी

Political News: विरोधकांची महाराष्ट्रातली पहिली बैठक शिवसेनेच्या बालेकिल्यात होणार
Uddhav Thackeray and Aditya  Thackeray
Uddhav Thackeray and Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीने उभारलेल्या 'इंडिया'ची (Indian National Developmental Inclusive Alliance) महाराष्ट्रातली पहिली वहिली बैठक शिवसेनेच्या बालेकिल्यात म्हणजे मुंबईत होणार आहे.

या बैठकीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी नेत्यांना एकत्र आणून बैठक यशस्वी करण्याची जबाबदारी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. मोदी-शहांच्या राजकारणाने पिछाडीवर गेलेले ठाकरे हे या निमित्ताने विरोधी वर्तुळात आघाडीवर दिसणार आहे.

Uddhav Thackeray and Aditya  Thackeray
Opposition Parties Meeting : 'INDIA 'नावावरुन वाद ; २६ विरोधी पक्षांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विरोधक पुन्हा एकदा या निमित्ताने एकवटतील. भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हरवण्याचा चंग बांधलेल्या देशातील तब्बल 26 विरोधी पक्षांची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. येत्या 25 ऑगस्टनंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यासाठीचे संयोजक महाविकास आघाडी असणार आहे.

विरोधी पक्षांची अर्थात 'इंडिया'ची ही बैठक मुंबईत असल्यामुळे यासंदर्भातील सर्व नियोजन शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांकडे असणार आहे. याआधी पहिली बैठक बिहारच्या पटना आणि नंतर दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडली. या दोन्ही बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.

Uddhav Thackeray and Aditya  Thackeray
Leaders Of Opposition Meeting : देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पुढची बैठक 'या' शहरात होणार

बंगळुरूमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीत या महाआघाडीला 'इंडिया' नाव देण्याची घोषणा झाली. यानंतर आता मुंबईत पार पडणाऱ्या बैठकीत विरोधकांचे नेमकी काय मुद्दे असणार? महाराष्ट्रातील प्रश्नावर या बैठकीत चर्चा होणार का? यासह विरोधी पक्षातील कोण-कोणते नेते उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com