Dr. Kiran Lahamte News
Dr. Kiran Lahamte NewsSarkarnama

Ahmednagar Politics : आमदार डॉ. किरण लहामटेंनी सरकारला दिला घरचा आहेर

NCP News : अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रात्र-दिवस वाचनालयाचे उद्घाटन लहामटे यांच्या हस्ते झाले.
Published on

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांनी शाळा खासगीकरण आणि कंत्राटी भरतीवर रोखठोक भूमिका मांडून सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'शाळा खासगीकरणाचा निर्णय हा आत्मघाती ठरेल', असे आमदार लहामटे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रात्र-दिवस वाचनालयाचे उद्घाटन लहामटे यांच्या हस्ते झाले. आमदार लहामटे यांनी शाळा खासगीकरणावर सुरूवातीला सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा निर्णय कसा आत्मघाती ठरू शकतो, हे देखील सांगितले.

Dr. Kiran Lahamte News
Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या निधीवरून उडणार राजकारणाचा भडका!

'सरकारने राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे खासगीकरण केलेले नाही, तसे ते करणार देखील नाहीत. फक्त शाळांची भौतिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचे ठरवले आहे. यात शाळा खासगीकरणाचा मुद्दा येत नाहीत, असे सांगत मी स्वतः शाळा खासगीकरण आणि सरकारी नोकर्‍यांच्या कंत्राटीकरणाविरोधात आहे, अशी भूमिका लहामटे यांनी मांडली. हे विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. येणार्‍या काळात शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने (State Government) केल्यास तो निर्णय आत्मघाती ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

लहामटे म्हणाले, 'शाळा दत्तक योजना ही समजून घेतली पाहिजे. एका दृष्टीने हा निर्णय आज चांगला वाटतो. पण उद्याच्या खासगीकरणाची भीती म्हणून हा निर्णय अनेकांच्या मनात साशंकता निर्माण करतो. त्यामुळे सरकारने यावर विचार केलाच पाहिजे'. अकोले तालुक्यातील उंचखडकची शाळा गावातील तरुणांनी उभी केली. बंद पडणारी शाळा 70 विद्यार्थ्यांवर नेवून ठेवली आहे, हे देखील कौतुकास्पद आहे. प्रत्येक वर्गात मॅट, प्रोजेक्टर आणि एलसीडी बसवले आहे, याची दखल घेण्यासारखीच आहे, असेही आमदार लहामटे यांनी म्हटले.

Edited by : Amol Jaybhaye

Dr. Kiran Lahamte News
Chandrashekhar Bawankule News : तुमच्या मनातील मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com