Former BJP Corporator Attacked: जळगाव जिल्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास चौघा जणांनी प्राणघातक हल्ला केला.
हल्लेखोरांनी चौधरी यांच्या चेहऱ्यावर, छातीवर कोयत्याने वार केले. धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या हाताचा पंजा कापला. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या चौधरींवर सध्या नाशिक येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रभाकर चौधरी यांचा मुलगा चेतन चौधरी याने यांसदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौधरी हे मंगळवारी( ता. २६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील वैष्णवी साडी सेंटरसमोरून दुचाकीवरून जात होते.
त्याचवेळी कारने प्रभाकर चौधरी यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ते जमिनीवर कोसळले. संशयित सोमा चौधरी व त्याचे ती साथीदार कारमधून उतरले. त्यांनी धारदार कोयत्याने प्रभाकर चौधरी यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर व उजव्या हातावर वार केले. या हल्यात प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी प्रभाकर चौधरी यांची दोन बोटे पडलेली होती. हल्ला केल्यानंतर मारेकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने निघून गेले.
मुलगा चेतन चौधरी याने घटनास्थळी पोहचून मित्रांच्या मदतीने वडील प्रभाकर चौधरी यांना गंभीर जखमी अवस्थेत देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी जखमी अवस्थेतच चौधरी यांनी मुलगा चेतन याला हल्ला कोणी केला हे सांगितलं.
सोमा चौधरी व त्याच्या तीन साथीदारांनी कोयत्याने वार केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दवाखान्यात आल्यानंतर प्रभाकर चौधरी यांची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना तत्काळ धुळ्याला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांना धुळ्याला हलविले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर चौधरी यांना सध्या नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर हा हल्ला झाला. दरम्यान हल्ल्यामागील कारण अजून समजू शकलेलं नाही.
हत्यारे नदी पात्रात फेकल्याचा संशय
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील गिरणा नदीपात्रात बुधवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन तलवारी व दोन कोयते असल्याची माहिती पोलिसपाटलांना समजली. त्यांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून हत्यारे जप्त केली. चाळीसगावात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ही हत्यारे वापरून मारेकऱ्यांनी ती नदीपात्रात फेकून दिली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.