
Jalgaon collector Death Threat : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याच्यासह जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अज्ञातांनी मुख्यमंत्री कार्यालयाला धमकीचे मेल पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयास धमकीचा मेल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पाठवला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलिस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावं अशा धमकीचा मेल मुख्यमंत्री कार्यालयाला अज्ञातांनी पाठवला आहे.
दरम्यान याप्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
मार्च महिन्यातही अशाप्रकारे धमकीचे मेल प्राप्त झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. जळगावात अशांतता पसरवू, अधिकाऱ्यांना ठार मारु अशा स्वरुपाच्या धमक्या त्यात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, 27 मार्च रोजी शेवटचा मेल प्राप्त झाला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याबाबत या अगोदरही तीन ते चार वेळेस अशाप्रकारे धमकीचे मेल मिळाले आहेत. या मेल मधील भाषा पाहता अशा ईमेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. तरीही खबरदारी म्हणून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.