Jalgaon Congress : जळगाव जिल्ह्यात भाजप पाठोपाठ कॉंग्रेसही भाकरी फिरवण्याच्या तयारीत

Congress likely to reshuffle Jalgaon district and taluka heads following BJP changes : भाजप पाठोपाठ जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. जळगाव जिल्ह्यातील आठ तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
Harshwardhan-Sapkal-.jpg
Harshwardhan-Sapkal-.jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यातील ३६ जिल्ह्यांत ५८ नवीन अध्यक्षांची निवड केली आहे. जळगाव जिल्ह्यातही भाजपने भाकरी फिरवली आहे. जळगाव पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी व महानगरअध्यक्ष पदी दीपक सूर्यवंशी यांची निवड केली आहे.

दरम्यान आता भाजप पाठोपाठ जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. जळगाव जिल्ह्यातील आठ तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या महाअधिवेशनात पाच वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा ठरावही संमत झाला आहे.

जिल्ह्याध्यक्ष बदलासाठी कॉंग्रेसमध्ये एक गट पूर्वीपासून सक्रीय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याक्षांची उचलबांगडी केली जाते का ते पाहावे लागणार आहे. शिवाय आठ तालुकाध्यक्ष देखील बदलले जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे निरीक्षक श्याम उमाळकर यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यात त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी पक्षाच्या स्थितीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार काही बदल केले जावू शकतात असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Harshwardhan-Sapkal-.jpg
Anil Gote On Arjun Khotkar : ..तर मला अटक करा, अनिल गोटे यांचे खोतकरांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा १४ मे रोजीचा जिल्हा दौरा युद्धजन्य स्थितीमुळे रद्द करण्यात आला होता. सपकाळ हे आता जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी पक्षसंघटनेत काही बदल केले जावू शकतात अशी माहिती उमाळकर यांनी दिली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये नेमके काय बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दोन अडीच वर्षांपूर्वी कॉंग्रेसचा गड असलेल्या जळगाव जिल्ह्यात आता कॉंग्रेसची वाताहात झाली आहे. मागे, कॉंग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी राज्याच्या सहप्रभारींसमोरच जिल्हाध्यक्षांबदल तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी जिल्हा कॉंग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे स्पष्ट झालं होतं.

Harshwardhan-Sapkal-.jpg
Vaishnavi Hagwane Baby : वैष्णवीचे बाळ आले आजोबांच्या कुशीत; अज्ञात व्यक्तीचा फोन अन् हायवेवर फिल्मीस्टाईलने ताबा...

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील मतभेद विसरुन, एकजुटीने विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. त्यादृष्टीने नवे प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळा घडवून आणण्यात कितपत यशस्वी होतात. त्यादृष्टीने ते काही संघटनात्मक बदल करतात का ते पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com