Jalgaon News: गिरीश महाजन यांच्या गावात मॉब लिंचिंग! मैत्रिणीसोबत कॅफेत बसलेल्या तरुणाला मारहाण, मृतदेह घरासमोर फेकला

Crime News Jalgaon: भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Suleman Khan murder
Suleman Khan murderSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राज्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. बुधवारी संभाजीनगर येथे प्रेयसीला गोळी मारण्याच्या प्रकरणानंतर आज पुन्हा जळगावात एका 21 वर्षीय मुलाला मारहाण करुन (Maharashtra Mob Lynching)त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे होमटाऊन असलेल्या जामनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

यात 21 वर्षीय तरुण सुलेमान खान याची अत्यंत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हत्येचा आणि मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्मबाबत माहिती घेण्यासाठी सुलेमान खान हा जामनेरला आला होता. त्यावेळी तो एका कॅफेमध्ये एका 17 वर्षीय मुलीसोबत बसला होता. पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या त्या कॅफेमध्ये 10-15 स्थानिक तरुण आले आणि त्यांनी दोघांना तिथून जबरदस्तीने घेऊन गेले.

त्यानंतर सुलेमानला जंगलात नेऊन दीर्घकाळ अमानुष मारहाण करण्यात आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावात नेऊन त्याच्या घरासमोर टाकण्यात आला. त्यावेळी त्याची आई, बहीण आणि वडील घराबाहेर आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुलेमानचे मामा साबीर खान यांनी केला आहे. सोमवारी सांयकाळी ही घटना घडली.

सुलेमानचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईक आणि स्थानिकांनी नकार दिला आहे. त्यांनी दीड तास जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्या गावी बेटावद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Suleman Khan murder
Saaniya Chandhok: सचिन तेंडुलकरांचे सुपुत्र अर्जुनची 'विकेट' घेणारी सानिया चंडोक कोण आहे?

पूर्ववैमन्यासातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या घटनेनंतर जामनेरमधील सर्व कॅफे सील करण्यात आले आहेत. तर काही कॅफेवर छापेमारी करुन तेथील साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली. सर्व कॅफेना सील ठोकले आहे. यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करू,असा इशारा कासार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com