Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले ; तारखा जाहीर, 'हे' दहा मातब्बर रिंगणाबाहेर, वारसदारांची एण्ट्री

Jalgaon DCC Bank Election Schedule Announced : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

JDCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या सोमवार (दि. २६)पासून आचारसंहिता लागू होणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २ नोव्हेंबरला होणार आहे. ३ नोव्हेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप केले जाणार आहे.

नाशिक सहनिबंधक संभाजी निकम यांनी १४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या २,५७१ मतदारांची यादी जाहीर केली होती. प्राथमिक विविध कार्यकारी संस्था, दूध संस्था, मालविक्री प्रक्रिया सहकारी संस्था, अर्बन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी आदी संस्थांचे सभासद मतदार आहेत. सध्या बँकेच्या २३७ शाखा आणि १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. बँकेच्या सुत्रांनुसार २५ ऑक्टोबरला संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती.

Jalgaon District Bank Election
Chhagan Bhujbal News : 500 कोटींवर कोण विश्वास ठेवेल? जरांगेंची ऑडिओ क्लिप म्हणजे निव्वळ गप्पा, भुजबळांचा टोला

महायुतीकडून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची रणनिती आखली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनल उभे करण्याचे ठरविल्याने निवडणक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीतर्फे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांनी नेत्यांकडे आपल्याला संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. तिन्ही पक्षांना समान जागा देत महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी रणनीती आखली जात आहे. संबंधित इच्छुकांनी त्या-त्या विविध कार्यकारी सोसायटीसह मतदारसंघात आपला जनसंपर्क सुरू केला आहे.

Jalgaon District Bank Election
Nashik ZP News : तीन ग्रामपंचायत अधिकारी एकाचवेळी निलंबित, सीईओ ओमकार पवारांचा त्र्यंबकेश्वर दौऱ्यात दणका

दिग्गजांचे वारसदार रिंगणात

सलग १० वर्षे संचालक पद भूषवलेले संचालक अपात्र ठरणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान मातब्बर संचालकांनी अगोदरच कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावांचे ठराव करून घेतले आहेत. आता या दिग्गजांचे कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरतील.

हे मातब्बर रिंगणाबाहेर

नव्या सहकारी तरतुदीनुसार विद्यमान चेअरमन संजय पवार, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी चेअरमन ॲड. रोहिणी खडसे या दहा संचालकांना निवडणुकीत भाग घेता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com