JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक : मंत्री गिरीश महाजनांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील उतरणार आखाड्यात?

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आखाड्यात मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.
JDCC Bank Election 2026 BJP strategy
JDCC Bank Election 2026 BJP strategySarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election News : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदारांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. काल चौथ्या दिवशी १५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे.

शेवटच्या दिवशी कोणते राजकीय दिग्गज मैदानात उतरतात याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उमेदवारीच्या चर्चेने उत्सुकता वाढवली आहे. या निवडणुकीत महायुतीचे गणित नेमके कसे जुळते, हे पाहावे लागणार आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाटील व महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास जिल्हा बँकेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची ठरेल. महायुतीच्या आमदारांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढणार आहे. जिल्हा बँकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी दाखल होणाऱ्या अर्जांकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल.

डावपेचांना नवी दिशा मिळू शकते. त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम महायुतीतील जागावाटपावरही होण्याची शक्यता आहे. त्यातच गुलाबराव पाटील यांची भूमिका आणि शिंदे गटाकडून व्यक्त होणारी नाराजी यामुळे युतीमधील मतभेदांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सध्या अनेक आघाड्यांवर घडामोडी सुरू आहेत. महायुतीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही, प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आहे, तर पक्षांतरामुळे राजकीय गणितेही बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोणते नेते मैदानात उतरतात, याकडे लक्ष लागले आहे. महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढतीचा पर्याय स्वीकारणार, हे स्पष्ट झाल्यानंतरच जिल्हा बँकेतील पुढील राजकीय चित्र समोर येईल

भाजपच्या प्रस्तावावर शिंदे गट नाराज

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. जागावाटपासंदर्भात भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवल्यास २१ जागांपैकी भाजपने तब्बल १३ जागांवर दावा सांगितल्याची माहिती आहे.

या प्रस्तावानुसार शिवसेना (शिंदे गट) यांना पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना तीन जागा देण्याचे गणित मांडण्यात आले आहे. मात्र, भाजपच्या या जागावाटपाच्या सूत्रावर शिंदे गट समाधानी नसल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.