जळगाव जिल्हा बॅंकेचे कवित्व संपेना : नाना पटोलेंकडून तिघांचे निलंबन

जळगाव जिल्हा बॅंक निकालाचा विषय हा नाना पटोलेंपर्यंत पोहोचला..
Nana Patole
Nana Patolesarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्या प्रकरणी कॉंग्रेसचे डि. जी. पाटील, अरूणा पाटील व राजीव पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही कारवाई केली आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी हे पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, कि जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात पक्षास बदनाम केल्याबाबत आपणास कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते.

प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून आपणास कळविण्या येते कि, वरील संदर्भात आपण सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत आपणास पक्षातून निलंबीत करण्यात येत आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनाही पत्राची पत्र पाठविण्यात आली.

Nana Patole
आयुष्यात कधीच रडलो नाही; पण त्या दिवशी डोळ्यात पाणी आले 

डि. जी. पाटील हे धरणगाव येथील रहिवासी असून ते कॉंग्रेसच्या इंटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तसेच उपाध्यक्ष म्हणूनहीत्यांनी काम पाहिले आहे. सौ.अरूणा पाटील या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनी जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणूकीत महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी केली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. तर राजीव पाटील हे रावेर येथील रहिवासी असून कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, तसेच जिल्हा बँकेचे माजीं संचालक आहेत, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणूकीत त्यांनी उमेदवारी दाखल केली होती, मात्र त्यांनी जाहीर माघार घेतली होती.

जिल्हा बँक निवडणूक सहकाराचा विषय आहे, पक्षाशी त्यांचा संबध नाही. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढली जात नाही.पक्षाशी संबधित उमेदवार न दिल्याने आम्ही उमेदवारी केली,हा प्रकार महाराष्ट्रात झाला आहे, परंतु जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताध्यक्षांचे कान भरल्याने ही कारवाई झाली,आम्ही कॉंग्रेसमध्येच राहणार असून प्रांताध्यक्षांना माहिती देणार आहोत, अशी प्रतिक्रिया डी. जी. पाटील यांनी दिली.

Nana Patole
सुशीलकुमार शिंदेंचे तिकिट कापले आणि मला रडू कोसळले : पवारांनी सांगितला हृद्य प्रसंग

आपण जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणूकीत माघार घेतली होती, पक्षविरोधी कोणतेही काम केले नाही.जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची गटबाजी सुरू असून त्याला आमदार शिरीष चौधरी यांचा पाठींबा आहे.त्यामुळेच ही कारवाई झाली. बोदवड नगरपरिषद निवडणूकीत पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आम्ही आमची भूमिका पुन्हा प्रांताध्यक्षाकडे मांडून निलंबन मागे घेण्याची विनंती करू, असे राजीव पाटील (माजी जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com