रंगत वाढली; अकरा जणांचा फोटो टाकून केला बहुमताचा दावा

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
Jalgaopn District Political News
Jalgaopn District Political NewsSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. ही निवडणुक आज होत असून त्रिशंकू स्थितीत सहकार गटाने अकरा जणांचे फोटो टाकून बहुमताचा दावा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. या सोसायटीचे तब्बल 34 हजार सभासद आहेत. (Jalgaon Latest Marathi News)

निवडणुकीत (Election) सहा पॅनेल होते. मात्र त्यात सहकार गट नऊ, लोकसहकार सहा, प्रगती गटाचे सहा संचालक निवडून आले. बहुमतासाठी 11 जण आवशक आहेत. यात आता लोकसहकार व प्रगती यांची युती झाल्याचा दावा गटनेते मनोज पाटील यांनी केला आहे.

Jalgaopn District Political News
निवडणूक आयोगाने ठाकरे सरकारला हवे तेच केले; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

सहकार गटाचे नेते उदय पाटील यांनीही आपल्यासोबत अकरा जण असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी अकरा संचालकांचा फोटोच 'सरकारनामा'ला दिला आहे. निवडणूक दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सहकार गटाचा दावा खरा ठरणार की लोकसहकार, प्रगती गटाची युती बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

नगरसेवक अपात्रप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

महापालिका नगरसेवक (Corporators) अपात्र प्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, ती आता ७ जूनला होणार आहे. जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) २७ नगरसेवक फुटले व त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा दिला होता.

Jalgaopn District Political News
भाजप आमदार गोरेंना दुसरा धक्का; फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाला दिलेला मतदानाचा व्हीप डावलल्याबद्दल या नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी याचिका भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल केली, तर फुटलेल्या गटानेही आम्हीच भाजपचे नगरसेवक आहोत, आमचा व्हीप डावलण्यात आला.

त्यामुळे भाजपचे नगरसेवक अपात्र ठरवावेत, अशी याचिका भाजपचे ॲड. दिलीप पोकळे यांनी दाखल केली. त्यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी दोन्ही गटांना नोटीस बजावून नाशिक येथे सुनावणीसाठी बोलाविले होते. पुढील सुनावणी आता ७ जूनला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com