
Jalgaon drug case : तुळजापूरला ड्रग्सच्या दोन-चार पुड्या सापडल्या, तर शंभर पोलिसांवर कारवाई झाली. जळगावमध्ये तर रॅकेटच आहे. पोलिस अधिकारीच ड्रग्स प्रकरणातील पसार आरोपीच्या संपर्कात असल्याचं समोर येते. यावरून या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.
यातच हे प्रकरण सत्ताधाऱ्यांचा एक स्वीय सहायक दडपण्याचा प्रयत्न करतोय, असा दावा करत माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी करत खळबळ उडवून दिली. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर जळगावमध्ये वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
जळगावमधील ड्रग्स प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणातील संशयित अब्रारर कुरेशी हा पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे या पसाराच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. यानंतर दत्तात्रय पोटे याला निलंबित करण्यात आले. आता हे प्रकरण दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांमधील एक स्वीय सहायक काम करत असल्याचा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी करत खळबळ उडवून दिली.
जळगावात ड्रग्स प्रकरणात पसार आरोपीसोबत पोलिस (Police) अधिकाऱ्याच्या संपर्काच्या प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी पोलिस दलाच्या कारभारावर संशय व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.ड्रग्स प्रकरणात पसार असलेल्या आरोपीसोबत उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे तब्बल 252 कॉल रेकॉर्डिंग समोर आले. यानंतर दत्तात्रय पोटेल याला निलंबित करण्यात आले आहे.
एकनाथ खडसे यांनी एक अधिकारी पकडला म्हणून विषय इथं संपलेला नाही, विषय अगदी व्यापक आणि गंभीर आहे. हे हिमनगाचं एक टोक आहे, असे म्हटले आहे. तुळजापूरमध्ये ड्रग्सच्या दोन-चार पुड्या सापडल्यानंतर, शंभर पोलिसांवर कारवाई होते. मात्र जळगावमध्ये एवढं मोठं रॅकेट असतानाही एकाच अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यात नेमकं काय झालं ते सुद्धा समोर येत नाही, असे म्हटले आहे.
पोलिस यंत्रणा यात दबलेली आहे. त्यामुळे यात कारवाई होत नाही. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. सत्ताधारी पक्षाचा एक स्वीय सहाय्यक हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर हे दुर्दैवी आहे, असेही एकनाथ खडसे म्हटले.
राजकीय आशीर्वादानेच एवढ्या मोठ्या ड्रग्सचे प्रकरण दडपले जाते, आणि गुन्हेगारांना संरक्षण मिळतं आहे. पोलिस अधिकारी यांचा यात सहभाग असल्याने पोलिस विभाग काय तपास करेल? त्यामुळे नार्कोटिक्स सेलमार्फत या प्रकरणाची चौकशी मागणी खडसे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.