Devendra Fadnavis : कबड्डी स्पर्धेला देवा भाऊ नाव का दिले? मुख्यमंत्री फडणवीस आयोजकांवर भडकले

Wardha Kabaddi Tournament : कबड्डी असोसिएशन विदर्भ संघाशी सलग्न असलेल्या ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने वर्धा येथे महिला व पुरुषांची देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती.
Wardha Kabaddi Tournament Devendra Fadnavis
Wardha Kabaddi Tournament Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Wardha News : कबड्डी हा भारताचा पारंपारिक खेळ आहे. यासाठी टीम स्पिरीट, चपळता, संयम आणि आक्रमकता लागते. कबड्डीत विरोधकांच्या टीममध्ये धुसून आऊट करावे लागते. या खेळाशी आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीश तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर स्ट्राईक केला असे सांगताना त्यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला देवा भाऊ कबड्डी स्पर्धा असे नाव का दिले? अशी विचरणा आयोजकांकडे केली.

कबड्डी असोसिएशन विदर्भ संघाशी सलग्न असलेल्या ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने वर्धा येथे महिला व पुरुषांची देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. समारोपाला देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार सुमित वानखेडे, राजेश बकाने, सागर मेघे, अभिनेते सुनील शेट्टी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेच्या समारोपात मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतात, आपल्या भाषणातून कोणाल आऊट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी यावेळी थेट आयोजकांकडे आपलो रोख करत थेट सवाल केला. यामुळे आयोजकांची घाबरगुंडी उडाली होती. यावेळी फडणवीस यांनी, कबड्डी खेळताना विरोधकांच्या संघात घुसावे लागते, दोन चार खेळाडूंना आऊट करून परत आपल्या टीमध्ये यावे लागते.

Wardha Kabaddi Tournament Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : शरद पवारांची 'ती' मागणी फडणवीसांनी केली मान्य, सहकारी संस्थांसाठी केली मोठी घोषणा

अशाच पद्धतीने भारतीय सेनेने पाकिस्तानातून घुसून अतिरेक्यांचे सर्व अड्डे उध्वस्थ करून आपल्या देशात सुखरूप एंट्री केली. भारताच्या विरोधात कुरापती केल्यास आम्ही काय करू शकतो, असा धडा पाकिस्तानला शिकवला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Wardha Kabaddi Tournament Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis : 'ती घटना दुर्दैवी, पण आता हा पुतळा 100 वर्षे...'; मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वास

या कार्यक्रमाला वीर कसेरी चित्रपटाची चमू प्रामुख्याने उपस्थित होते. याचाही उल्लेख करताना फडणवीस यांनी सोमनाथ मंदिरावर परिकायांचा हल्ला परतावून लावणाऱ्या हमीरची कोहील यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असला तरी आपल्या देशाचा इतिहास सर्वांना माहिती असावा याकरिता प्रत्येकाने हा चित्रपट बघावा असे आवाहन केले. मात्र त्यांनी या स्पर्धेला देवा भाऊ नाव का दिले? अशी विचारणा केल्याने शेवटपर्यंत याचा खुसाला आयोजकाच्यावतीने कोणालाच करता आला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com