Badlapur Egg Trafficking Case : स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, महत्वाचा दुवा पोलिसांच्या हाती..जळगावातून ठोकल्या बेड्या

Jalgaon egg trafficking connection : बदलापूर, नाशिकनंतर आता जळगाव जिल्ह्यापर्यंत स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे येऊन पोहचले आहेत. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
Badlapur Egg Trafficking Case
Badlapur Egg Trafficking CaseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra egg trafficking case : राज्यभरात चर्चेत असलेले स्त्रीबीज तस्करीचे जाळे बदलापूर, नाशिकनंतर आता जळगाव जिल्ह्यापर्यंत येऊन पोहचले असून, जळगावमधून एका संशयिताला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचे जळगाव कनेक्शन समोर आल्याने जळगाव जिल्ह्यातील आयव्हीएफ सेंटरही आता पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचा तपास करताना बदलापूरनंतर नाशिक कनेक्शन समोर आलं. नाशिकच्या 'मालती आयव्हीएफ सेंटरवर' महापालिकेसह पोलिसांनी कारवाई केली. हे सेंटर सील करण्यात आलं आहे. त्यानंतर आता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथून सतीश चौधरी या संशयिताला बुधवारी (दि. ४) सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

अटकेनंतर संशयित सतीश चौधरी याला अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याआधी या प्रकरणात चार महिला, एक मेडिकल चालक व नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचा डॉक्टर अमोल पाटील याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार पोलिस सतीश चौधरीपर्यंत पोहचले.

Badlapur Egg Trafficking Case
Maharashtra IVF Centers : स्री बीज विक्री प्रकरणात फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर; राज्यातील सर्व IVF सेंटरची होणार झाडाझडती

सूत्रांच्या माहितीनुसार, स्री बीज तस्करीप्रकरणात डोनर महिलांचे बनावट आधारकार्ड बनविण्याचे काम सतीश चौधरी करत होता. तो अवघ्या शंभर रुपयात बनावट आधारकार्ड काढून देत होता. या आधारकार्डचा वापर टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेसाठी केला जात व त्याद्वारे रुग्णाची ओळख लपवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

सतीश चौधरी हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा मानला जात असून, बनावट आधार कार्ड बनवण्यासोबतच ठाण्यातील सेंटरची जबाबदारी सांभाळणे, स्त्रीबीजाचे सॅम्पल नाशिकला पोहोचवणे, तसेच बनावट कागदपत्रे तयार करणे अशी सर्वच कामे तो करत होता.

Badlapur Egg Trafficking Case
Nashik Police Recruitment : टोमण्यांवर मात करत खाकीकडे झेप, नाशिकमध्ये पोलिस भरतीच्या मैदानात तृतीयपंथीयाची दमदार कामगिरी

या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असावेत, असा संशयही व्यक्त केला जात असून राज्यातील फडणवीस सरकारने याप्रकरणी राज्यातील सर्व ८६० IVF सेंटरची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस व आरोग्य विभागामार्फत संयुक्तपणे या आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वत: विधानपरिषदेत तशी घोषणा केली.

गरजू व गरीब डोनर महिलांची दिशाभूल करुन त्यांना अत्यल्प पैसे देऊन त्यांचे स्त्रीबीज विकत घेऊन ते कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याचा आरोप आहे. बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, नाशिक आणि जळगाव या शहरांमधून आतापर्यंत एकूण सात आरोपींना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com