Jalgaon News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर थरार, कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांनी अंगावर रॉकेल ओतलं अन् घेतलं वाल्मिक कराडचं नाव..

Jalgaon Ex Congress leader Sanjay Varade pours kerosene on himself in front of CM’s convoy over alleged injustice : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Jalgaon News
Jalgaon NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शुक्रवारी जळगावच्या आकाशवाणी चौक परिसरात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे थरार नाट्य घडलं. यावेळी पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि.२०) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एखा व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला.संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो कॉंग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष आहे.

सकाळी दहा वाजता मुंबईहून जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा धरणगावकडे महामार्गाने रवाना झाला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर जळगाव काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वराडे यांना वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ऊर्जा विभागाच्या कामांचे कंत्राट घेतले होते, त्यावेळी चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याची चोरी झाली. त्यामुळे आपले मोठे नुकसान झाले. त्यातून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे वराडे यांनी सांगितलं.

ते म्हणाले, चोरीच्या तपासाचे काम सोपविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेही आपल्याला न्याय दिला नाही. त्याच्याविषयी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या रूपाने दुसरा वाल्मीक कराड जळगाव जिल्ह्यात तयार झाला आहे, असा आरोप संजय वराडे यांनी केला.

शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संजय यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या घटनेने मोठा गोंधळ उडाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com