Jalgaon Hit And Run case : पुण्यानंतर आता जळगाव हिट अँड रन केस चर्चेत; 18 दिवसानंतर NCP नेत्याचा मुलगा ताब्यात

crime News : कल्याणीनगरनंतर आता जळगाव अपघातप्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला तब्बल १८ दिवसानंतर ताब्यात घेतले आहे.
hit and run case
hit and run casesarkarnama

jalgaon News : हिट अँड रन केसच्या पुणे आणि जळगाव या दोन्ही केसमध्ये बिल्डरचे कनेक्शन समोर आले आहे. जळगाव येथील हिट अँड रन केसमध्ये एकाच कुटुंबातल्या 4 जणांचे बळी गेले होते. त्या केसमध्ये बिल्डरचा मुलाचे कनेक्शन समोर आले. जळगावची हिट अँड रन केस पुण्याच्या केसपेक्षा आधीची आहे. कल्याणीनगरनंतर आता जळगाव अपघातप्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला तब्बल १८ दिवसानंतर ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणात पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांवर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्यावर याआधी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यासोबत एनडीपीएस गुन्हा दाखल केला आहे.

hit and run case
Pune Hit And Run Case : 'बिल्डर का बेटा हूँ 'भाई',इसलिए...'; धक्कादायक व्हिडिओ 'त्या' अल्पवयीन मुलाचाच?

हिट अँड रन केसमध्ये जळगाव येथील चार जणांना प्राण गमवावे लागले होते. 7 मे 2024 रोजी जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे अशीच भरधाव वेगाने कार चालवून दोघांनी एकाच कुटुंबातल्या चौघांचे बळी घेतले. कारमध्ये असलेले दोघेजण बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांचा मुलगा अखिलेश पवार हे होते. हे दोघेही अपघातात जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले.

राजकीय दबावातून जळगावची हिट अँड रनची जास्त गंभीर केस दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांनाही ताब्यात घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट सूचनांनंतर जळगावच्या केसमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः सूत्रे ताब्यात घेऊन तपास काम चालवले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला तब्बल १८ दिवसानंतर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com