Pune Hit And Run Case : 'बिल्डर का बेटा हूँ 'भाई',इसलिए...'; धक्कादायक व्हिडिओ 'त्या' अल्पवयीन मुलाचाच?

Pune Accident News : पुण्यातील'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बालहक्क न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाला या अगोदर दिलेला जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय दिला आहे.
Pune hit and run case
Pune hit and run casesarkarnama
Published on
Updated on

Pune Accident News : पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात जामीन मिळालेल्या अल्पवयीन मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत संबंधित आरोपीने आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ खरा की आहे 'डीपफेक' याबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. पण या व्हिडिओमुळे आता पुणे पोलिसांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे.

मात्र, हा व्हिडिओ खरा निघाला तर अगरवाल कुटुंबाचे पाय आणखीत खोलात जाण्याची शक्यता आहे.पण हा व्हिडिओ सोशल मीडियामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुणेकरांच्या संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

Pune hit and run case
Pune Car Accident News: पुणे अपघातप्रकरणी आरोपीवर पुढील खटला कसा चालवणार? आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं

पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyaninagar) परिसरात भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं, या घटनेत दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाने काही तासांतच जामीन मंजूर केल्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरलं होतं. आरोपीला जामीन देण्याच्या भूमिकेवर विरोधकांसह समाजस्तरातूनही संतापाची लाट उसळली होती. तसेच खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेत याप्रकरणात लक्ष घातलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बालहक्क न्याय मंडळाने (Child Rights Justice Board) अल्पवयीन मुलाला या अगोदर दिलेला जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता आरोपी वेदांत अगरवालला (Vedant Agarwal) 14 दिवस बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.

दोन जणांचा बळी घेतल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने रॅप साँग गायल्याची धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो जामीन मिळाल्यानंतर जामीनाला विरोध करणार्यांविरोधात अश्लाघ्य भाषा वापरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, व्हिडिओ वेदांत अग्रवाल याचा नसल्याचा दावा त्याच्या वकील आणि कुटुंबियांनी केला आहे.

व्हिडीओत काय ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. पण त्याचबरोबर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या व्हिडिओत संबंधित अल्पवयीन तरुण म्हणतोय, “बारबार आ रहाँ हैं की, भाई पोर्शेने उडा दी, दो लोगों की जान ले ली. 18 साल का लडका नशे में गाडी चला रहा था. जस्टिस…जस्टिस… कोई इस बारे में बात नहीं कर रहाँ. सारे बात कर रहें है मेरी फिडबॅक की एक लाईन बोलके हमेशा चले जाते हैं. कोई बात ही नहीं कर रहा इस बारे में. भाई एक काम करो ना, माँ XX XX XXX XX किसी बिल्डर X XX? एक बिल्डर पकडो, और उसके पास अपने XXX भेज दो अशा अश्लील भाषेत संवाद साधताना दिसून येत आहे. तसेच घटनेचा पश्चाताप तर नाही उलट रॅप साँग गाताना तो तरुण दिसला.

तर कल्याणीनगरमध्ये भरधाव कारने दोघांना चिरडून जीव घेतल्याचा गुन्हा भयावह असल्यामुळे अल्पवयीन आरोपीवर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळाकडे केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अल्पवयीन आरोपीची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय दिला. मात्र आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे पोलिस तपासानंतर ठरवलं जाईल, असंही न्यायालयाने सांगितलं आहे. (Pune Porsche Car Accident)

Pune hit and run case
Pune Car Accident News: पुणे अपघातप्रकरणी आरोपीवर पुढील खटला कसा चालवणार? आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com