Jalgaon : 'शिंदेनी उठाव केला नसता तर, राष्ट्रवादीच भाजप सोबत गेली असती!'

Jalgaon : आमदार आपल्या सोबत कायम रहावे, म्हणून त्यांना बोलावे लागते.
Gulabrao Patil News, Jalgaon News
Gulabrao Patil News, Jalgaon NewsSarkarnama

जळगाव : राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेसच भाजप सोबत सत्तेत दिसली असती, असे धक्कादायक विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलतांना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शिर्डी येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकित केले होते. यावर पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहाटेचा कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रीपदाची शपथ घेतली होती, असा खोचक टोलाही त्यांना लगावला.

"शहाजीबापू पाटील तर आता बोलले परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी भाजपसोबत गेली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबतच गेली असती," असा दावाही त्यांनी केला.

Gulabrao Patil News, Jalgaon News
Gujrat Election : गुजरात सोडण्यासाठी आम आदमी पक्षाला भाजपची 'ही' ऑफर!

"जयंत पाटील यांनी शिंदे -फडणवीस सरकार कोसळण्याचा दावा केला होता, मात्र आज राष्ट्रवादीचे शिबीर संपले आहे. त्यामुळे आपण सरकार पडण्याची वाट पाहत आहोत. आपले आमदार आपल्या सोबत कायम रहावे, म्हणून त्यांना असे बोलावे लागते. आमचे सरकार पडणार नाही, ते भक्कम आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ आमचे सरकार पूर्ण करेल, असा दावाही पाटील यांनी केला.

Gulabrao Patil News, Jalgaon News
शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या; दहशतवादी संघटनांनी दिली होती धमकी

आम्ही पक्ष बदलला नाही :

शिवसेना पक्ष सोडण्याबाबत ते पाटील म्हणाले की, आम्ही पक्ष सोडलेला नाही किंवा भाजपतही प्रवेश केलेला नाही. उलट आमच्या पक्षाचे नाव बाळासाहेबाची शिवसेना असे आहे, आमची निशाणीही ढाल तलवार आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना पक्ष आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com