Jalgaon Dudh Sangh : आमदार मंगेश चव्हाणांचा खडसेंना पुन्हा दणका : जळगाव दूध संघातील बहुचर्चित नोकरभरती रद्द

खडसेंच्या यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
Eknath Khadse-Mangesh Chavan
Eknath Khadse-Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाच्या काळात जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाची (Dudh Sangh) वादग्रस्त ठरलेली नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी दिली. खडसेंच्या यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले. (Jalgaon jillha dudh sangh job recruitment cancelled : Mangesh Chavan's announcement)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज (ता. २१ जानेवारी) अध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संघाच्या कामाकाजाचा आढावा तसेच आर्थिक माहिती घेण्यात आली. संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत ९ कोटी ६७ लाख रूपयांचा तोटा झाल्याची माहिती या वेळी मिळाली. यात ऑगस्ट २०२२ या महिन्यात प्रशासकीय मंडळ होते. या काळात २० लाख रूपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या महिनाभराच्या काळात संघात होणारा अतिरिक्त खर्च कमी केला आहे. अतिरिक्त असलेले तब्बल २० कामगार कमी केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Eknath Khadse-Mangesh Chavan
Pune Police News : राजकीय नेत्यांमार्फत फिल्डिंग लावली; तरीही बदली नाही झाली : काहींची धावपळ वाया

नोकर भरतीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप

जिल्हा दूध संघात सन २०२१मध्ये १०४ कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात आली होती. राखीव जागाच्या प्रश्‍नावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे न्यायालयाने या नोकर भरतीला ‘स्थगिती’ दिली होती. नोकरभरतीचा प्रश्‍न संघाच्या निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. खडसे यांचा पराभव झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सत्ता आली. आता या नवीन संचालक मंडळाने वादग्रस्त ठरलेली ही नोकर भरतीच रद्द केली आहे.

Eknath Khadse-Mangesh Chavan
Congress News : काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, थेट ३८ नेत्यांची हकालपट्टी!

याबाबत चेअरमन चव्हाण यांनी सांगितले की, ही नोकरभरती रद्द करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ही नोकर भरती रद्द झाली माहिती आम्ही न्यायालयालाही देणार आहोत. आता संघ तोट्यात असल्यामुळे नोकरभरती करण्यात येणार नाही. ज्यावेळी संघ नफ्यात येईल, त्यावेळी ही भरती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse-Mangesh Chavan
Rahul Narvekar News : राहुल नार्वेकर, लोढांवर अटकेची टांगती तलवार? अजामीनपात्र वॉरंट जारी!

संघाचे वर्षाला १५ लाख वाचणार

जिल्हा दूध संघाचे बटर वाई येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. हा खर्च नेहमीच वादात होता, त्यामुळे आता हे कोल्ड स्टोरेज संघाच्या आवारातच उभारण्यात आले आहे. त्याच ठिकाणी बटर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संघाचे वर्षाला १५ लाख रूपये वाचणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

Eknath Khadse-Mangesh Chavan
Uddhav Thackeray News : ठाकरेंनी डाव टाकला; कदम पिता पुत्रांची कोंडी; मोठा नेता करणार घरवापसी?

या संचालक मंडळाच्या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, रोहित निकम, संजय पवार, अरविंद देशमुख, श्‍यामल झांबरे, पूनम पाटील, मधुकर राणे, ठकसेन पाटील, दिलीप वाघ, तर विरोधी गटाच्या छाया देवकर, प्रमोद पाटील, पराग मोरे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com