Rahul Narvekar News : राहुल नार्वेकर, लोढांवर अटकेची टांगती तलवार? अजामीनपात्र वॉरंट जारी!

Rahul Narvekar News : खटला आता आरोप निश्चितीच्या टप्प्यावर!
Rahul Narvekar News : Mangalprabhat Lodha
Rahul Narvekar News : Mangalprabhat Lodha Sarkarnama

मुंबई : न्यायालयातील एका खटल्यातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने खासदार व आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने आता जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

Rahul Narvekar News : Mangalprabhat Lodha
Nashik Graduate Constituency Election : खडसे अॅक्शन मोडवर : नाशिक पदवीधरची गणितं बदलणार?

वीज युनिटमध्ये दरवाढ केल्यामुळे नार्वेकर यांनी आंदोलन केले होते. मुंबईतील बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करताना, त्यांना मारहाण केल्याचा आरोप नार्वेकर यांच्याविरूद्ध आहे. यात प्रकरणात राहुल नार्वेकर व मंत्री लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा खटला आता आरोप निश्चितीच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. पण, सुनावणीला नार्वेकर व लोढा गैरहजर राहात असल्याने, या प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया खोळंबून राहिली आहे

या खटल्यातील इतरही सर्व आरोपी सतत गैरहजर राहत आहेत. यामुळे आरोपी नेमके भाजपचे आमदार की मुंबईतील नगरसेवक आहेत, याबाबत न्यायालयाने चाचपणी करू शकले नाहीत.

Rahul Narvekar News : Mangalprabhat Lodha
Sandeep Joshi : खेळाडू थोडे गरमच असतात, ‘त्या’ घटनेबाबत माजी महापौरांचे स्पष्टीकरण...

विधानसभेच्या आता पुढील वेळापत्रकाबाबत कार्यवाहीसाठी बैठक सुरू सत्र सुरू आहे, याकारणास्तव नार्वेकर विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांना पोहचायला १५ मिनिटे विलंब होईल, असे काल शुक्रवारी नार्वेकरांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. यावर न्यायाधीशांनी म्हंटले की,‘मी यावर काय करावे, हे तुम्हीच सांगा. मी माझ्याकडून पुरेशी संधी दिली. त्यांना फोन करून बोलवा, आम्ही वॉरंट रद्द करू,’ असे म्हणत, न्यायालयाने नार्वेकर व लोढा यांच्यावर जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com