Girish Mahajan :'उन्मेष पाटलांना संकट काय आहे हे कळेल', गिरीश महाजनांचा गर्भित इशारा

Loksabha Election : सुरेशदादा जैन हे कोणताहीच दबाव स्वीकारणारे नाहीत. त्यांनी नेहमी आक्रमक राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रश्‍नच नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
 Unmesh Patil Girish Mahajan
Unmesh Patil Girish Mahajansarkarnama

Jalgaon Politics : जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने पुन्हा तिकीट दिले नाही. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. स्वतः निवडणूक न लढता आपले कट्टर समर्थक करण पवार यांना ठाकरे गटाकडून खासदारकीचे तिकीट मिळवून दिले. त्यामुळे जवळगावची एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची झाली आहे. करण पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्यांनी उन्मेष पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर ते ‘संकटमोचक’ नसून जिल्ह्यावर ‘संकट’आहे, असा आरोप केला होता. या आरोपाला चोख प्रत्युत्तर देत गर्भित इशारा गिरीश महाजन यांनी पाटील यांना दिला आहे.

 Unmesh Patil Girish Mahajan
Raosaheb Danve News : आता तरी जाल ना, ठाकरेच्या टीकेला मी जंगलातला वाघ म्हणत दानवेंचा टोला..

'मी जिल्ह्यावर संकट नाहीच. मात्र तुमच्यासाठी संकट काय आहे? हे तुम्हाला लवकरच कळेल, असा इशारा गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील Unmesh Patil यांना दिला .पक्षाने तुम्हाला आमदार, खासदारक दिली. त्यावेळी त्यांना मी संकटमोचक वाटत होतो. परंतु उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना मी संकट वाटू लागलो आहे. परंतु त्यांच्यासाठी मी ‘संकट’काय आहे? हे त्यांना लवकरच कळेल, असे देखील महाजन Girish Mahajan म्हणाले.

सुरेशदादांवर कोणताही दबाव नाही

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना भाजपच्या उमेदवारांना पाठींबा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला, या आरोपाला उत्तर देतांना महाजन म्हणाले, की सुरेशदादा जैन हे कोणताहीच दबाव स्वीकारणारे नाहीत. त्यांनी नेहमी आक्रमक राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रश्‍नच नाही. त्यांचे आणि आपले प्रेमाचे संबध आहेत. त्यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्‍वास व्यक्त करीत भाजपच्या उमेदवारांना पाठींबा देण्याची भूमिका घेतली आहे.

सिंचनाचे प्रश्‍न सोडविले

विरोधकाकडून जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्‍न सोडविले नसल्याचा दावा केला जात आहे. त्याबाबत बोलतांना महाजन म्हणाले,की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्‍न सोडविले आहेत. मेडिकल हब निर्माण केले आहे.जिल्हा क्रिडा संकुल उभारले आहे. पाडळसरे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून चालना दिली आहे. वाघूर, शेळगाव, भागपूर प्रकल्पानाही चालना दिली आहे. या शिवाय मोदी सरकारने देशाप्रमाणे जिल्ह्यातील दळवळणास चालना देत चारपदरी महामार्ग तयार केले आहेत. त्यामुळे आम्ही विकासाचे कामे केलेली नाहीत हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com