Uddhav Thackrey News: लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्याचा समाचार घेतला.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात करीत असलेल्या राजकारणाने त्याची पीछेहाट होईल. यंदाच्या निवडणुकीत भाजपला लोक त्यांची जागा दाखवतील, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.
यासंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे यांनी यावे, त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करावा. मात्र भाजपवर कोणतेही आरोप केले तर लोक ते स्वीकारतील, असा समज करून घेऊ नये. लोकांनी उद्धव ठाकरे यांना गांभीर्याने घ्यायचे नाही असे ठरविले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांचे अस्तित्व किती आहे याचे उत्तर मिळेल.
महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यंदाच्या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाही, असे सांगितले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षासोबत असताना शिवसेनेचे (Shivsena) 18 खासदार निवडून येत होते. आता यंदाच्या निवडणुकीत त्यांचे 15 आमदार तरी निवडून येतील का? हे त्यांनी पाहावे.
महाराष्ट्रातील चुकीच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची अवस्था वाईट झाली आहे. शिवसेनेतील लोकांनीच उद्धव ठाकरे यांना पक्षाबाहेर काढले आहे. याची त्यांना अद्यापही जाणीव झालेली नाही. आता मतदारांनीही फक्त भारतीय जनता पक्षालाच मतदान करायचं आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असे ठरविले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालातून उद्धव ठाकरे यांना त्याची जाणीव होईल, असा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.