BJP Jalgaon News : भाजपची मोठी कारवाई.. 27 जणांची केली पक्षातून हकालपट्टी, जळगाव महापालिकेत नेमकं घडलं तरी काय?

Jalgaon Municipal Politics : जळगावात भाजपने बंडखोरांवर कठोर कारवाई केली आहे. तब्बल 27 जणांची भाजपने हकालपट्टी केली आहे. यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.
jalgaon BJP
jalgaon BJPSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : महापालिका निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. तिकीट न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरुन भाजपच्याच उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली असून माजी नगरसेवक जितेंद्र मराठेंसह २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

जळगावात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी तीन्ही पक्षांची पक्की महायुती झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते तथा राज्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या मुलाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात भाजपने कारवाई केली आहे. बंडखोर जितेंद्र मराठेंची पक्षाने हकालटपट्टी केली आहे. जळगावमध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या या कारवाईची सध्या शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे.

पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने 27 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती असलेल्या जितेंद्र मराठे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यासह 27 जणांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ही कारवाई महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने दोन दिवसांपूर्वी भाजपाचे बंडखोर उमेदवार तथा माजी स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांच्यासह महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या २७ जणांना नोटीस देऊन दोन दिवसांत उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. मात्र बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेऊन महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला नाही. अखेर पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

या २७ जणांची केली हकालपट्टी

संगीता गोकुळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावण बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा सूर्यवंशी, जितेंद्र भगवान मराठे, प्रिया विनय केसवानी, रुपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयूरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे यांची भाजपने हकालपट्टीची कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com