Jalgaon Municiple Corporation : दोन प्रभागातील हरकत मान्य, जळगाव महापालिकेच्या प्रभागरचनेत बदल; अंतिम रचना जाहीर

Jalgaon Municipal Corporation finalizes ward restructuring : दोन प्रभागांतील हरकत मान्य करत रचनेत बदल करण्यात आला आहे. मनपा प्रभाग ४, ५ मधील हरकत मान्य करण्यात आली आहे.
Jalgaon Municiple corporation
Jalgaon Municiple corporationSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिका प्रशासनाने ३ सप्टेंबरला १९ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या आराखड्यावर नागरिक, माजी नगरसेवक व सामाजिक संस्थांकडून एकूण ७० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. यावर महापालिका प्रशासनाने सुनावणी घेऊन विभागीय आयुक्त तसेच निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला होता. निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली असून, दोन हरकती आणि चार सूचना मान्य करून ६४ हरकती नामंजूर केल्याने ९० हरकती प्रशासनाने फेटाळून लावल्या आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. ९) अंतिम प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रभागातील आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप रचनेनुसार १९ प्रभागांमध्ये एकूण ७५ सदस्यांची निवड होणार आहे. यामध्ये १८ प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग तीन सदस्यीय आहे. नव्या आराखड्यात फारसा बदल नसला तरी प्रभाग ५, ८. ९, १०, १५, १६ व १७ मध्ये लक्षणीय फेरबदल करण्यात आले आहेत.

दोन हरकतींवरून बदल

हरकतींचा अभ्यास करून प्रभाग ४ व ५ मधील एकाच विषयावर माजी नगरसेवक कैलास सोनवणे व किशोर चौधरी यांनी दोन हरकती सादर केल्या होत्या. हरकतींवर झालेल्या सुनावणीत मांडलेल्या मुद्यांवरून या हरकती मान्य करण्यात आल्या. त्यामुळे प्रभाग ४ मधील प्रारूप प्रभागरचनेतील आधीचा नकाशा क्रमांक ४ मध्ये ८११ मतदारांची संख्या वाढली असून, पाचमधील मतदार संख्या कमी झाली आहे. तसेच पिंप्राळा परिसरातील तीन व कांचननगरातील एका सूचनेत प्रभागरचना कायम ठेवण्याची मागणी होती. त्या सूचनाही स्वीकारण्यात आल्या.

Jalgaon Municiple corporation
Ajit Pawar Politics : अजितदादांनी छगन भुजबळांना पुन्हा डावललं : माणिकराव कोकाटेंवरील प्रेम कायम; नाशिकचा कारभारीच ठरवला!

इच्छुकांची मोर्चेबांधणी

जळगाव महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाल्याने इच्छुकांनी आता निवडणूक तयारीला गती दिली आहे. संभाव्य उमेदवारांकडून जनसंपर्क, गटबाजी व प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत आतापासून मोर्चाबांधणीला सुरुवात झाली आहे.

मतदार याद्यांचे काम

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग १ ते १९ मधील मतदान यादी अद्यावत तयार करण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्यामुळे अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, मतदार याद्याअद्यावत व आरक्षण सोडत ही निवडणूक प्रक्रिया देखील आता लवकरच होणार असल्याने महापालिका निवडणूक या वर्षी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Jalgaon Municiple corporation
Nashik Politics : नाशिक महापालिका स्वबळावरच लढू, भाजप पदाधिकाऱ्यांंनी फडणवीसांना सांगितले गणित..

व्याप्ती : ब्राह्मण सभागृह बळिराम पेठ, शनिपेठ, गुरु नानक नगर, गवळीवाडा, दाळफड, बालाजीपेठ, सराफ बाजार, मारोती पेठ, श्रीराम पेठ, जुने जळगाव, पतंगगल्ली, जोशी पेठ, जळगाव पीपल्स बँक संचालित रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट सार्वजनी शाळा, नेरीनाका बसस्थानक, जोशी पेठ वखार परिसर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com