Ajit Pawar Politics : अजितदादांनी छगन भुजबळांना पुन्हा डावललं : माणिकराव कोकाटेंवरील प्रेम कायम; नाशिकचा कारभारीच ठरवला!

Chhagan Bhujbal has been sidelined once again by Ajit Pawar : भुजबळांना पुन्हा एकदा डावलून अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate, Chhagan Bhujbal
Ajit Pawar, Manikrao Kokate, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच काही संघटनात्मक बदल केले. यात पक्षाने नाशिक जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदाची धुरा ही क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटेंवर (Manikara Kokate) सोपविली आहे. त्यामुळे पक्षात जेष्ठ असलेल्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महायुती सरकारच्या (Mahayuti Sarkar) मंत्रिमंडळात देखील भुजबळांना सुरुवातीला स्थान देण्यात आलं नव्हतं. भुजबळांऐवजी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना बळ देत त्यांना थेट कृषीमंत्री केलं होतं. भुजबळांसाठी तो फार मोठा धक्का होता. मंत्रीपद न मिळालेल्या भुजबळांनी मग मोठं रान उठवलं. त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली, "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना" असा इशाराही दिला पण दादांनी काही ऐकलं नाही.

मग भुजबळांनी ओबीसी नेतृत्वाचे हत्यार उपसत मुख्यमंत्री फडणवीसांना जवळ करुन मंत्रीपद पदरात पाडून घेतलं. संपले संपले असे म्हणणारे भुजबळ पुन्हा मंत्रीमंडळात आले. नुसते आले नाही तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आपल्याच सरकारला त्यांनी शिंगावर घेतलं ते आजूनही खाली उतरण्याचं नाव घेत नाहीत. सरकारने हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या जीआरला सुद्धा भुजबळांनी विरोध केला.


Ajit Pawar, Manikrao Kokate, Chhagan Bhujbal
Nashik Politics : नाशिक महापालिका स्वबळावरच लढू, भाजप पदाधिकाऱ्यांंनी फडणवीसांना सांगितले गणित..

छगन भुजबळांच्या मराठाविरोधी भूमिकेवर पुन्हा आता अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची माहिती आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षातील काही नेत्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची नाराजी बोलून दाखवत अप्रत्यक्षपणे भुजबळांना दादांनी खडेबोल सुनावल्याचे समजते. नागपूर येथे झालेल्या शिबिरात देखील भुजबळांचे नाव न घेता ज्या मंत्र्यांना इतर कामे असतील त्यांनी मंत्रिपद खाली करावं असा इशारा अजित पवारांनी दिला होता.


Ajit Pawar, Manikrao Kokate, Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis : नाशिकबाबत फडणवीसांनी टाकली 'गुगली' म्हणाले, युती केली तर युतीचे 'शंभर'

छगन भुजबळ हे नाशिकचे (Nashik) असून जिल्हाभरात त्यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी देखील भुजबळ इच्छुक आहेत. असे असताना पक्षाने पुन्हा एकदा भुजबळांना डावलत माणिकराव कोकाटे यांना संधी देत त्यांच्या हाती जिल्ह्याची धुरा सोपवली आहे. त्यामुळे भुजबळांना डावलण्यात आल्याने नाराजीची भावना भुजबळ समर्थक खाजगीत व्यक्त करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com