Jalgaon News, 18 Jan : जळगाव महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने विरोधकांचा सुपडा साफ केला. यामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. त्या यशाचे कारण आता पुढे आले आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 46 जागा जिंकल्या.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या बालेकिल्ल्यात शंभर टक्के ठेवला. त्यामुळे हा निकाल राज्यभर चर्चेचा विषय आहे. जळगाव महापालिकेत महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. भाजपच्या वतीने आमदार राजू मामा भोळे आणि मंगेश चव्हाण यांनी प्रचारात झोकून दिले होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आक्रमक प्रचार केला. त्यामुळे विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठे यश मिळाले नाही. महायुतीला मिळालेले यशाची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. 75 सदस्यांच्या जळगाव महापालिकेत बहुतांशी नवे चेहरे निवडून आलेत. मतदारांनी प्रदीर्घकाळ राजकारणात असलेल्या उमेदवारांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे 46 पैकी 28 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे पाच तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष यांचा प्रत्येकी एक पहिल्यांदाच निवडणूक लढवीत होता. त्यामुळे आता महापालिकेत 39 नवे चेहरे दिसतील.
पूर्वाश्रमीचे खानदेश विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मात्र सध्या भाजपवासी झालेले सुनील खडके यांनी सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे. नगरसेवक दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, माझी स्थायी समिती सभापती सुचिता हाडा या तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उद्धव ठाकरे आणि अन्य पक्षाच्या माजी महापौरांसह बारा प्रमुख नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के जागा महायुतीला मिळाल्या होत्या.
नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच 46 पैकी 28 अर्थात जिम्म्याहून अधिक नगरसेवक फ्रेश चेहरा असलेले आहेत. मंत्री महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या नियोजनाला यश आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.