Jalgaon NCP News : मंत्री गुलाबराव पाटील यांना निवडणुकीत आव्हान देणार!

जळगावचे कार्यकर्ते म्हणतात, ‘आम्ही शरद पवारासोबतच राहणार आहोत’
Gulabrao Devkar & Gulabrao Patil
Gulabrao Devkar & Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, की आपण पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबतच आहोत. कार्यकर्त्यांनीही हेच मत व्यक्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध लढणार आहोत. (We will have prepared to fight for our leader Sharad Pawar)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यालयात (Jalgaon) मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष पाटील यांनी माहिती दिली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सहकार आघाडीचे अध्यक्ष वाल्मीक पाटील, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रतिभा शिरसाट, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Gulabrao Devkar & Gulabrao Patil
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांची साथ...? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासाठी संघर्ष करायची आम्हा सर्वांची तयारी आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार काही आमदारांसह बाहेर पडले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत शपथ घेतली आहे. त्यामुळे पक्षात फूट पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.

Gulabrao Devkar & Gulabrao Patil
Nilesh Lankhe On NCP Crisis : 'मला काहीही नको, पण पवार परिवार एक असावा ही परमेश्वराकडे प्रार्थना'; आमदार लंकेंची भावना !

मात्र, जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे सर्व नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत. आमदार एकनाथराव खडसे मुंबईत प्रदेशाध्यक्षांसोबत आहेत. डॉ. सतीश पाटील, अरुणभाई गुजराथी, संतोष चौधरी, राजीव देशमुख, दिलीप वाघ यांच्यासह सर्व नेत्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे.

आगामी काळात शरद पवार यांच्यासाठी जो संघर्ष करावा लागेल, त्याच्यासाठीही आमची तयारी असल्याचे सर्वांनी ठरवले आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांची मुंबईत बुधवारी (ता. ५) बैठक होणार आहे. या बैठकीस सर्व उपस्थित राहणार असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले.

Gulabrao Devkar & Gulabrao Patil
NCP Whip News: मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं टाकला मोठा डाव; आमदारांना व्हिप जारी....

...तर मंत्री अनिल पाटील यांचे स्वागत

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अजित पवार यांच्यासमवेत गेलेले जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल पाटील मंत्री झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आल्यास स्वागत करणार काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले, की जो घरी येईल, त्यांचे स्वागत करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात आल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com