NCP Whip News: मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं टाकला मोठा डाव; आमदारांना व्हिप जारी....

Sharad Pawar & Ajit Pawar : बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर दोन्ही गटाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता
NCP President Update News
NCP President Update News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या वर्षी दुसरा बळकट आणि कट्टर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटानं आपआपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.५) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार आहे. तर अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये होईल. या बैठकीत दोन्ही गटाकडून पुढील दिशा ठरवली जाईल. त्यामुळे या बैठकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आता दोन्ही गटानं या बैठकीसाठी व्हिप जारी केला आहे.

NCP President Update News
Sanjay Shirsat on Ajit Pawar : 'आम्हाला बहुमताची गरज नव्हती, तरीही अजित पवारांना का घेतलं' ; शिरसाट थेटच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाकडून बैठकींना उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे यांनीही व्हिप जारी केला आहे. तसेच आता अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनी देखील आमदारांना मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्हिप जारी केला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी पक्षातील सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. उद्या पक्षाची बैठक होत आहे. बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असा पक्षादेश काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पत्र जारी केलं आहे.

NCP President Update News
Maharashtra Politics: अजितदादांच्या बंडातील 'त्या' तीन नेत्यांवर राज ठाकरेंना संशय; म्हणाले...

व्हिपमध्ये काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)च्या सर्व विधानसभा सदस्यांची दुपारी १ वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र बैठक आयोजित केली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळाच्या सर्व विधानसभा सदस्यांनी अवश्य उपस्थित राहावे असा पक्षादेश आहे.

मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला होणाऱ्या बैठकीसाठी सगळ्यांनी उपस्थित राहण्याचा व्हिप जारी केला आहे. विधानपरिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत 5 आमदार तर शरद पवारांसोबत 4 आमदार आहेत.

NCP President Update News
Ramesh Kadam support to Sharad Pawar : माजी आमदार रमेश कदम शरद पवारांच्या पाठीशी

आता शरद पवार आणि अजित पवार(Ajit Pawar)गटाकडून बोलावण्यात आलेल्या बुधवारी( दि.५) बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र, बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर दोन्ही गटाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com