Jalgaon News: राज्यात काल (बुधवारी) सर्वत्र उत्साहात मतदान झाले. नागरिक, नेते, सेलिब्रिटी आदींचे मतदानांचा हक्क बजावला. तर जळगाव जिल्ह्यात एका घरात दु:खाचे सावट असताना कुटुंबप्रमुखाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
घरात पत्नीचा मृतदेह असताना राजेंद्र बच्छे यांनी थेट मतदानकेंद्र गाठून मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ गुलाब बच्छे व कुटुंबातील अन्य सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना राजेंद्र बच्छे यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत नवा आदर्श निर्माण केला.त्यांचा कर्तव्यामुळे गावात त्यांच्या कुटुंबाचं कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कळमडू गावातील शेतकरी राजेंद्र बच्छे यांच्या पत्नी छायाबाई बच्छे (वय 40) यांचे मतदानाच्या दिवशीच (बुधवारी) सकाळी सहा वाजण्यापूर्वी निधन झाले.
गेल्या चार महिन्यापूर्वीच बच्छे यांच्या मुलाची अग्निवीर भरतीत निवड झाली आहे. त्यासाठी तो बेळगाव (कर्नाटक) येथे प्रशिक्षणासाठी गेला आहे. त्यामुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो येऊ न शकल्याने बच्चे यांच्या मुलीने आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये तर हळदीच्या मंडपातून येवून एका नववधूने आपला मतदानाचा हक्क बजावला.
काल विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघात मतदान सुरू असतानाच काही घटनांमुळे लोकशाही उत्सवाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना झाल्यात. एका अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आता एका मतदाराचाही मतदानाचा हक्क बजावताना मृत्यू झाला. तर एका अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटकाही आला आहे.
शनिवार (ता 23) मतमोजणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातील दोन प्रमुख पक्षांच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती, या निवडणुकीत मतदारराजा कोणाला कौल देतो, राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येतं की मविआ सत्ता स्थापन करेल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.