Jalgaon news| विसर्जन मिरवणुकीला गालबोट; महापौरांच्या घरावर हल्ला

Jalgaon news| Jayashree Mahajan| भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
Jalgaon news| Jayashree Mahajan|
Jalgaon news| Jayashree Mahajan|

जळगाव : दहा दिवसांच्या उत्सवानंतर राज्यभरात शुक्रवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र शेवटच्या दिवशी राज्यभरात काही ठिकाणी या दिवशी गालबोट लावणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र दुसरीकडे शहरात मात्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन (Galgaon Mayor) यांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

जळगाव शहरातील मेहरून परिसरात महापौर महाजन यांचे निवासस्थान आहे. मिरवणूकीच्या दरम्यान एका गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकला. हे त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच कुटूंबांच्या महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला. मात्र काही संतप्त कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. असा आरोप जयश्री महाजन यांनी केला आहे.

Jalgaon news| Jayashree Mahajan|
तावडे,जावडेकर, रहाटकरांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेश कायम

या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकाच्या घरावरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल जयश्री महाजन यांनी उपस्थित केला आहे. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलिस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तर दूसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक दुपारी सुरू झाली होती. मात्र गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते एकाच जागी ते नाचत राहिल्याने एक ते दीड तास ही मिरवणूक एकाच ठिकाणी ताटकळत राहिल्याचे दिसून आले.त्यामुळे इतर मंडळातील कार्यकर्त्यामध्ये रोष असल्याचं दिसून आलं. एक तास मिरवणूक खोळंबल्यानंतरही नाशिकहून परतलेले गिरीश महाजन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. त्यावेळीही अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आपल्या मंडळात आपल्या सोबत नाचण्यासाठी आग्रह करीत होते. त्यामुळेही अनेक मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com