Jayant Patil : आरक्षणाबाबत सरकारमध्येच गोंधळ; मुख्यमंत्री अन् मंत्र्यांच्या भूमिकेमुळे संभ्रम

Maratha Reservation : आम्हीही वाट पाहत आहोत, सरकार मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेत आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : "मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक भूमिका घेतात, तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री वेगळी भूमिका घेतात, त्यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे.

जळगाव येथे आक्रोश मोर्चाचे आज जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ते जळगाव दौऱ्यावर आले आहेत.

राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे उपस्थित होत्या. जयंत पाटील म्हणाले, राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्येच गोंधळ आहे.

Jayant Patil
Apoorva Hire : हिरे बंधूंचा पाय खोलात; आणखी एक गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळी भूमिका घेतात, तर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाहेर वेगळीच भूमिका जाहीर करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक भूमिका घ्यावी व तीन जनतेत जाहीर करावी. मराठा आरक्षणाबाबत सरकारने मनोज जरांगे यांना दिलेली मुदत आता जवळ आलेली आहे. तरीही सरकारने याबाबत मराठा समाजाला कशापद्धतीने आरक्षण देणार, याबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही. आम्हीही वाट पाहत आहोत, सरकार मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेत आहे.

मराठा, ओबीसी तणाव कमी करण्यास अपयश

राज्यात मराठा समाज व ओबीसी यांच्यात तणाव वाढत असल्याचे सांगून ते म्हणाले, की दोन समाजात तणाव वाढू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही, उलट सरकारच तणाव वाढविण्यासाठी प्रयत्न करते आहे की काय? असे आता वाटायला लागले आहे. मात्र, सरकारने तणाव कमी करण्यासाठी दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने भूमिका जाहीर करावी.

ललित पाटील प्रकरणाची चौकशी करा

ड्रग्जमाफीया ललित पाटीलप्रकरणी आता अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. सरकारमधील मंत्र्यांचाच या प्रकरणात हात असल्याचे दिसून येत आहे. त्याचे जळगाव, नाशिक कनेक्शन काय? याचीही आता चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सरकारने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Jayant Patil
Ajara Sugar Factory News: राज्यात नाही, पण कोल्हापुरात जमलं; भाजप-काँग्रेस-ठाकरे गटाची युती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com