Police News: पोलिस मुख्यालयातील सरकारच्या ‘जावयां’ची दाणादाण

प्रशासनाकडून कामचुकारांपेक्षा बातम्या कोण पुरवतोय याचा सुरु केला शोध.
Police Sketch
Police SketchSarkarnama

जळगाव : जिल्‍हा (Jalgaon) पोलिस दलातील (Police) जवळपास ३० टक्के रिझर्व्ह पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जमा असलेल्या पोलिस मुख्यालयात (Police Headquarter) फुकटचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय उजेडात आला. या कामचुकार पोलिसांच्या टोळक्याने आता आपल्यातील फितुर शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर, सरकारचे ग्रेडेड जावई गटात मोडणाऱ्यांची पुरती दाणादाण उडाली आहे. (Police Officers trcing who leaked news insted Resolving issue)

Police Sketch
Trible News: समस्या सोडविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा बसने प्रवास

जिल्‍हा पोलिस दलाच्या एकूण ३५ पोलिस ठाण्यांतील आस्थापनेवर मंजूर मनुष्यबळापेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. जामनेरसारख्या पोलिस ठाण्यात दीडशे कर्मचारी कमी पडतील, मात्र अवघ्या ४८ पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याची स्थापना झाल्यापासून तपासाधिकारी, जाप्ता कर्मचाऱ्याचा तुटवडा आहे. मुक्ताईनगर असो की मेहुणबारे या पोलिस ठाण्यांत बदली करून जाण्यास कर्मचारी तयारच नसतात. ज्यांची इच्छा आहे त्यांच्या बदल्या होत नाहीत किंवा ते जावई गटात मोडत नसल्याने त्यांना इच्छित स्थळी बदली करवून घेता येत नाही. दरम्यान, कर्मचारी तुटवडा असलेल्या पोलिस ठाण्यांमधून बातमीसंदर्भात ‘सकाळ’ कार्यालयात फोन करून कौतुकही करण्यात आले.

Police Sketch
Revenue : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्याच

साहेब बिझी अन् ‘जावयां’च्याच मीटिंग

सध्या गणेश विसर्जनाची तयारी सुरू असल्याने जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह सर्वच पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, उपनिरीक्षक, डीवायएसपी बंदोबस्तात व्यस्त आहेत. परजिल्ह्यातून आलेला बंदोबस्त, प्रशिक्षणार्थी अधिकारी, रिक्रूट कर्मचारी असा साधारण साडेतीन हजारांचा फौजफाटा बंदोबस्ताला तैनात आहे. असे असताना सरकारचे जावई असलेल्या मुख्यालयातील या छुप्या कामचुकारांकडे अद्याप कुणाचेही लक्ष गेलेले नाही. ‘सकाळ’मध्येच कशा बातम्या येतायत... आपल्यातीलच कुणीतरी माहिती देत असावा म्हणून त्या फितुर कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी आज दिवसभर स्टॅण्डिंग मीटिंगचे सत्र मुख्यालयात सुरू होते.

हजेरी मास्तरला विरोध

होम डीवायएसपी संदीप गावित यांच्या स्वाक्षरीने ३ सप्टेंबरला ड्यूटी बटवडा आदेश पारित करण्यात आले होते. त्यात देवीदास श्रावण वाघ यांच्याकडेच बटवडा अंमलदारांचे कामकाज देण्यात यावे, सुभाष धीरबक्षी, रज्जाक सय्यद यांना नेमण्यात यावे, देवीदास वाघ मुख्य ड्यूटी बटवडा अंमलदाराचे कामकाज पाहून सिरोमनियल परेड, पीटी परेड व नवचैतन्य कोर्स आदींचे व्यवस्थापन करतील असा थेट आदेश होम डीवायएसपी कसे काढू शकतात, असा या ड्रिल इन्स्ट्रक्टर कर्मचाऱ्यांचा आक्षेप होता. आम्ही जे प्रशिक्षण घेतले तेच प्रशिक्षण वाघ मास्तरने घेतले आहे, आमच्यावर कुठला ठपकाही ठेवण्यात आलेला नाही. या नियुक्तीबाबत आम्हाला आयजी साहेबांची (पोलिस महानिरीक्षकांची) भेट घ्यायची असल्याने परवानी देण्याची मागणी ड्रिल इन्स्ट्रक्टरतर्फे करण्यात आली.

एलपीसींचा खांद्याला खांदा

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना हायसे वाटते. पोलिस दलात मात्र कामचुकार पोलिसांप्रमाणे महिला कर्मचारीही मागे नाहीत. बोगस हजेरीच्या जोरावर महिला कर्मचारीही घरी राहून ड्यूटी करणाऱ्या आहेत. फक्त ठराविक महिलांनाच ड्यूटी लावली जाते. स्पेशल कॅटेगरीत मोडणाऱ्या महिला कर्मचारी हजेरी मास्तरला महिन्याला ठरलेली रक्कम देऊन महिन्यातून एक-दोन ड्यूटी करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com