Trible News: समस्या सोडविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा बसने प्रवास

प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विद्यार्थ्यांसह बसने प्रवास केला.
MLA Rajesh Padvi in Bus.
MLA Rajesh Padvi in Bus.Sarkarnama
Published on
Updated on

तळोदा : आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांनी चक्क स्वतः बसने प्रवास करीत दुर्गम (Trible) भागातील विद्यार्थ्यांना (Students) दररोज भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक थांब्यावर विद्यार्थ्यांसाठी बस थांबावी अशी सूचना संबंधितांना केली. आमदारांना बसमध्ये पाहून नागरिकांनीही त्यांची भेट घेत आश्चर्य व्यक्त केले. (MLA Rajesh Padvi discussed with students in the ST Bus)

MLA Rajesh Padvi in Bus.
Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

चक्क आमदार राजेश पाडवी यांना बसमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शालेय विद्यार्थ्यांसाठी आमदारांनी बसने प्रवास केल्याने तालुक्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे.

MLA Rajesh Padvi in Bus.
`या`मुळे उच्चशिक्षीत सरपंच शीतल नंदन यांना झाली अटक!

अक्कलकुवा - तळोदा बस फेऱ्यात शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नसल्याचे व प्रत्येक बस थांब्यावर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेतली होती. शालेय विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी बुधवारी अक्कलकुवा - तळोदा बसने प्रवास केला. यावेळी त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांशी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचा अडचणी जाणून घेतल्या.

प्रत्येक बस थांब्यावर बस थांबवण्याचा सूचना त्यांनी चालक वाहकाला केल्या. यामुळे प्रत्येक थांब्यावर बस थांबत होती, विद्यार्थी बसत होते व आमदारांना बसमध्ये पाहून आश्चर्यचकित होत होते. दुसरीकडे अक्कलकुवा आगारातील अनेक बस या जुन्या झाल्या आहेत. अनेकांचे पत्रे निघाले आहेत तर अनेक बस नादुरुस्त होऊन रस्त्यावरच बंद पडत असतात. त्यात प्रवाशांना कमालीचे त्रासाचे ठरते.

शहरात अनेकदा गर्दीच्या ठिकाणीच बस बंद पडल्याचा घटना याआधीही घडल्या आहेत. त्यात आता शालेय विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवण्यासाठी चक्क आमदारांना बसने प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक बस थांब्यावर बसमध्ये बसविण्याची सूचना आमदार राजेश पाडवी यांनी चालक वाहकांना केली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com