Hindu Jagruti Sabha : वादग्रस्त सुरेश चव्हाणकेंना `ते` भाषण भोवले...गुन्हा दाखल

हिंदू जनजागृती सभेत धार्मिक विद्वेष पसरवणारे भाषण केल्याचा पोलिसांचा दावा.
Suresh Chavanke
Suresh ChavankeSarkarnama

Jalgaon police news : धार्मिक विद्वेष पसरविण्याचा आरोप असलेल्या व एक वाहिनीची संचालक असलेल्या सुरेश चव्हाणके यांना जळगाव येथील सभेत केलेले भाषण चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने हिंदू जनजागृती मंचला चांगलाच झटका बसला आहे. (Jalgaon Police registered a case against controvarsial Chavanke)

जळगाव (Jalgaon) येथे हिंदू (Hindu) जमजागृती मंचतर्फे सभा झाली होती. या सभेची परवानगी देताना पोलिसांनी (Police) आयोजकांना सशर्त परवानगी दिली होती. या सभेत प्रक्षोभक आणि धार्मिक विद्वेष पसरवणारी भाषणे झाल्याची तक्रार आहे. पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Suresh Chavanke
Nashik BJP News: भाजप शहराध्यक्षपदासाठी महापालिका ठेकेदारांचे लॉबिंग?

जळगाव शहरातील जी. एस. मैदानात हिंदू जनजागृती समितीच्या जाहीर सभेत प्रक्षोभक व आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबरला सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेत दिल्लीतील एका वाहिनीचा संचालक सुरेश चव्हाणके (रा. दिल्ली) आणि प्रशांत जुवेकर (रा. जळगाव) अशा दोघांनी आपल्या भाषणातून दोन समाजात तेढ निर्माण होतील, असे आक्षेपार्ह विधाने केली.

Suresh Chavanke
Suhas Kande News: अपात्रतेचा निकाल येणारच नाही...हे आहे कारण!

त्यात पोलिसांनी सभेसाठी दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करण्यात आले. चार महिन्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत जुवेकर आणि सुरेश चव्हाणके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

चार महिन्यानंतर...शहाणपण?

ही सभा २५ डिसेंबरला झाली होती. सभेला मोठा पोलिस बंदोबस्त होता. परवानगी देतांना पेालिसांनी अटीशर्ती निर्धारीत केल्या होत्या. काही सुचनाही देण्यात आल्या होत्या. तसेच, गोपनिय विभागाचे कर्मचारी, राज्य गुप्त वार्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सीआयडीची टिम कार्यक्रमाला हजर होती. त्यांनी आपआपल्या वरिष्ठांना आणि शासनाला त्याच दिवशी भाषणाचे रिपोर्टींग केले होते. असे असतांना चक्क चार महिने उलटल्यावर पोलिसांना ते भाषण आक्षेपार्ह्य वाटून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com