NDCC Bank : जिल्हा बॅंकेत वसुलीप्रकरणी प्रशासनाकडून ३ संचालकांना अभय, सहकारमंत्र्यांच्या सुनावणीत धक्कादायक प्रकार उघड

Nashik District Bank Recovery Case : संचालकांकडील १८२ कोटींच्या वसुली प्रकरणी तीन माजी संचालकांना वगळून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. हे लक्षात आल्यानंतर सगळ्याच संचालकांना एकत्रितरीत्या नोटिसा बजवाव्यात, असे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले आहेत.
NDCC Bank News
NDCC Bank NewsSarkarnma
Published on
Updated on

Nashik DCC Bank News : नाशिकची जिल्हा बॅंक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. बॅंक प्रशानसनाकडून कर्जवसुली प्रकरणी संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, नाशिक जिल्हा बॅंकेच्या १८२ कोटींच्या वसुली प्रकरणी तीन संचालकांना प्रशासनाने अभय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संचालकांकडील १८२ कोटींच्या वसुली प्रकरणी जिल्हा बॅंक प्रशासनाकडून तीन माजी संचालकांना वगळून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. ही बाब बुधवारी (ता.16) राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सुनावणीदरम्यान उघड झाली. माजी संचालक अद्वय हिरे, परवेज कोकणी, अनिल आहेर यांना बॅंकेकडून नोटीस बजावण्यात आलेली नाही. या तिघांनाही अभय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

NDCC Bank News
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वराच्या दारात भाविकांची फसवणूक, 600 रुपयांची दर्शन तिकीटे विकली 2 हजाराला

बुधवारी सहकारमंत्र्यांच्या सुनावणी वेळी काही संचालकांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असता, त्यावर सगळ्याच संचालकांना एकत्रितरीत्या नोटिसा बजवाव्यात, असे आदेश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले. या नोटिसा दिल्यानंतर या प्रकरणी एकत्रितरीत्या सुनावणी घेतली जाणार आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार असल्याची माहिती सहकारमंत्र्यांनी दिली आहे.

अनियमितपणे कर्जवाटप केल्याप्रकरणी तत्कालीन संचालक तसेच अधिकाऱ्यांसह 44 जणांवर कलम 88 च्या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला होता. 182 कोटी रुपये संबंधितांकडून वसूल करण्याची शिफारसही करण्यात आली होती. मात्र, यावर झालेल्या सुनावणीत त्यास स्थगिती देण्यात आली होती. परंतु, या अहवालाला दिलेली स्थगिती उठविण्यात आली. त्यावर मंत्री पाटील यांच्याकडे सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या.

NDCC Bank News
Sangram Thopate News: पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? तीनवेळा आमदार राहिलेला नेता काँग्रेसची साथ सोडणार, भाजप प्रवेशाची तारीखही ठरली ?

कुणाला बजावल्या नोटिसा ?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक दिग्गजांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यात शिरीष कोतवाल, आमदार दिलीप बनकर, राजेंद्र भोसले, नानासाहेब सोनवणे, राघो आहिरे, जे. पी. गावित, माणिकराव शिंदे, गणपतराव पाटील, संदीप गुळवे, देवीदास पिंगळे, सुचेता बच्छाव, चंद्रकांत गोगड, दत्ता गायकवाड, नानासाहेब पाटील, राजेंद्र डोखळे, शोभा बच्छाव, माणिकराव बोरस्ते, धनंजय पवार, वैशाली कदम, वसंत गिते, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, नरेंद्र दराडे यांना नोटिसा प्राप्त झाल्या. मात्र, अद्वय हिरे, परवेझ कोकणी आणि अनिल आहेर यांना नोटीस बजाविल्या गेल्या नव्हत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com