Congress Politics : जिल्हाध्यक्ष म्हणतात,'देणगी द्या काँग्रेसची उमेदवारी मिळवा'

Congress gear up for assembly elections : जळगाव जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून सुरू आहे चाचपणी.
congress jalgaon
congress jalgaonSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Congress News : लोकसभा निवडणुकीत सुस्त झालेला काँग्रेस पक्ष आता पुन्हा सक्रिय होऊ लागला आहे. काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते. मात्र सध्याचे चित्र पाहता जळगाव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. पक्षाची संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करण्यासाठी धावपळ सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा घेण्यात आला. यावेळी अनेकांनी उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली. या सर्व चर्चेत जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार आणि सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी यांनी वेगळीच शक्कल लढवली. या दोघांनीही ज्यांना उमेदवारी हवी असेल त्यांनी पक्षाला देणगी द्यावी अशी घोषणाच करून टाकली. देणगी दिलेल्या नेत्यांची विधानसभा उमेदवारीसाठी शिफारस करू असे त्यांनी जाहीर केले आहे.

congress jalgaon
Congress candidate : काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी

पदाधिकार्‍यांच्या या घोषणांमुळे जळगाव जिल्ह्यात सध्या देणगी द्या आणि काँग्रेसचे उमेदवारी मिळवा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाने जिल्ह्यात मुक्ताईनगर, जामनेर, रावेर, चोपडा या मतदारसंघाचा अपवाद वगळता सर्व विधानसभा मतदारसंघांचा (Vidhansabha Constituency) अहवाल तयार केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते राहुल गांधी यांना घाबरतात असा दावा यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आंदोलन केले. त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

congress jalgaon
Nagar Urban Bank Scam Case: दिलीप गांधींच्या कुटुंबाला न्यायालयाचा मोठा दणका, 5 जणांचा जामीन फेटाळला; अटकेची टांगती तलवार

जनमानसात राहुल गांधी यांची प्रतिमा उंचावली आहे. त्यांना देशभरात पाठिंबा मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही शेतकरी, महिला ,गरीब जनता अथवा सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले नाही. केवळ निवडणुका आणि राजकारण ही दोनच उद्दिष्टे भाजपची आहेत असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com