Ladki Bahin Sheme: पाऊन लाख लाडक्या बहिनींवर कारवाईची टांगती तलवार, जळगावच्या सत्ताधारी भाजप आमदारांची डोकेदुखी वाढणार!

Jalgaon Politics; Big Shock for 75 thousands `ladki bahin` beneficiaries womens in Jalgaon District, Administration may take action-हमखास मते देणाऱ्या लाडक्या बहिनींवरील सरकारी कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची करणार कोंडी?
Ladki-Bahin-Yojana.jpg
Ladki-Bahin-Yojana.jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी नेत्यांसाठी सर्वच महिला एव्हढ्या लाडक्या झाल्या होत्या की त्यांचे कौतूक करताना त्यांना शब्द कमी पडत होते. याच योजनेमुळे सत्ताधारी महायुतीला निवडणुकीत भरघोस यश देखील मिळाले. आता मात्र ही स्थिती बदलण्याची चिन्हे आहेत.

लाडकी बहिण योजनेमुळे राज्य शासनाचे आर्थिक गणित बिघडले. तिजोरीत अक्षरशः खडखडाट असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार टिकेचे धमी झाले. त्यावर खुलासा करताना उपमुख्यमंत्री पवार यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे.

सध्या राज्य सरकारच्या अनेक खात्यांचा निधी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा अनुदान देण्यासाठी वर्ग करावा लागत आहे. आदिवासी विकास विभागाचा निधी वर्ग झाल्याची तक्रार आहे. सार्वजमिक बांधकाम विभागासह विविध खात्यांच्या कामांची बिले थखल्याने कंत्राटदार गेले सहा महिने आंदोलन करीत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टिकेचे धनी झाले आहेत.

Ladki-Bahin-Yojana.jpg
Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणामुळे कोणाच्या पोटात का दुखते?, त्या पोटदुखीवर मुख्यमंत्री उपाय करतील!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करताना शासनाने जाणिवपूर्वक कोणतेही निकष न लावता जी महिला अर्ज करील तीला अनुदान मंजूर केले. अगदी दोन महिन्यांचे आगाऊ अनुदान म्हणून थेट साडे चार हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात निधी वर्ग केल्याने महिलांत आनंदाचे वातावरण होते.

या योजनेचा गैरफायदा अनेकांनी घेतल्याचे पुढे आले आहे. अगदी पुरूषांनी देखील अर्ज भरून महिलांचे अनुदाव घेतल्याचे उघड झाले. शासकीय कर्मचारी महिला, चार चाकी वाहने असलेल्या एकाच कुटूंबातील अनेक महिला देखील लाडकी बहिण असल्याचे आढळल्याने प्रशासन आता गांभिर्याने चौकशी करीत आहे. त्यात राज्यातील सुमारे पंचवीस लाख महिलांची नावे वगळण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यात देखील ही चौकशी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दहा लाखांहून अधिक लाडक्या बहिंनींनी ऑनलाईन अर्ज केले होते. वर्षभरानंतर त्यातील अनेक गोंधळ पुढे आले. पडताळणी मोहिमेत आतापर्यंत ७५ हजार ६९५ लाडक्या अपात्र ठरल्या. यातील अनेक महिला थेट सत्ताधारी भाजप नेत्यांशी संबंधीत, परिचीत, आप्त स्वकीय आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते त्यांच्या प्रश्ना उत्तर देताना हैरान झाले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी राज्यभरात सुरू आहे. ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो, त्यांच्यासाठी ती आता नियमीत बाब झाली आहे. मात्र ज्या लाखो महिलांची नावे वगळण्यात आली, त्या मात्र नेत्यांवर चांगल्याच संतापल्या आहेत. त्याचा फटका महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बसण्याच्या धास्तीने सत्ताधारी नेते चांगलेच धास्तावले आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com