Unmesh Patil : भाजप ही गांडूळाची...' जळगावमधील उद्धव ठाकरेंचा नेता घराणेशाहीवरुन घसरला..

Unmesh Patil slams BJP leaders : मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व आमदार मंगेश चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी आपआपल्या पत्नींना उमेदवारी दिली आहे. त्यावरुन उन्मेष पाटील यांनी निशाणा साधला.
Unmesh Patil & Girish Mahajan
Unmesh Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्री संजय सावकारे व आमदार मंगेश चव्हाण यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पत्नीला मैदानात उतरवलं आहे. त्यावरुन शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी खासदार उन्मेश पाटील यांनी तिघांवर थेट निशाणा साधला आहे.

घराणेशाहीला विरोध करणारे भाजपचे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिल्याने प्रामाणिक कार्यकर्ता भरडला गेला आहे. यामुळे कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा 'सतरंज्या उचलण्याची' वेळ आल्याची खंत व्यक्त उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी, भाजप ही गांडूळाची ××× झाली आहे, अशी टीका माजी खासदार पाटील यांनी केली. घराणेशाहीला विरोध असल्याची भाषा भाजप करत होते. मात्र, आज मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नीला महत्वाच्या नगराध्यक्षपदावर उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. एकेकाळी भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हटला जात असे. मात्र, आता आमदारांसह खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबियांचा झाला आहे, असा आरोप माजी खासदार पाटील यांनी केला.

Unmesh Patil & Girish Mahajan
Nashik Politics : गिरीश महाजनांचा दादा भुसे यांना डबल झटका; शिंदेंच्या आणखी एका मंत्र्याचे घरातच अस्तित्वच धोक्यात!

पक्षाशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नवीन लोकांना संधी देण्याचे धोरण सध्या भाजपकडून अवलंबण्यात आले आहे. यापूर्वी भाजपमध्ये बदलाची भूमिका होती, आता बदला घेण्याची भूमिका आहे. अर्थात, त्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यांच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही, असेही माजी खासदार पाटील म्हणाले.

भाजपमध्ये मी यापूर्वी काम केले असून भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच खासदारकीचा राजीनामा दिला व नंतर ठाकरे गटात प्रवेश केल्याचे उन्मेष पाटील म्हणाले. भाजपने २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेच नाही. भाजपला दुप्पट आमदार आणि दुप्पट खासदार कसे करता येतील, यातच रस आहे. त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण नाही.

Unmesh Patil & Girish Mahajan
BJP Strategy : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे डबल इंजिन ; विरोधात लढलेल्या दोन्ही उमेदवारांच्या हातात कमळ

धुळे जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या भेटीसाठी शेताच्या बांधावर जाण्याचे कष्ट घेतले नाही. याउलट आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी भेटीसाठी विमानतळावर बोलवून घेतले होते. आज केळी, कापूस आणि सोयाबीनला पुरेसा भाव नाही. त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी कोणत्याही बैठका नाहीत. पैशांच्या जोरावर सत्ता मिळवणे, हेच त्यांचे लक्ष्य असल्याची टीका उन्मेष पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com