Jalgaon politics : जिल्ह्यात भाजप मजबूत म्हणता, मग फोडाफोडीचा खेळ का? उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

Unmesh Patil of Shiv Sena (UBT) slams BJP for poaching party workers in Jalgaon despite holding four ministerial positions in the district. रविवारी उन्मेष पाटील यांच्या उपस्थिती उबाठा पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पाटील यांनी भाजवर जोरदार हल्लाबोल केला.
Unmesh Patil & Girish Mahajan
Unmesh Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Unmesh Patil : जळगाव महानगरपालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन, लढण्याचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी उन्मेष पाटील यांच्या उपस्थिती ही बैठक पार पडली. या बैठकीत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बैठकीत बोलताना पक्षाचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप पक्षासह जिल्ह्यातील महायुतीच्या चारही मंत्र्यांना लक्ष्य केलं. जिल्ह्यात चार-चार मंत्री असतानाही निम्न तापी प्रकल्प, सात बलून बंधारे यांना अद्याप सरकारकडून निधीच मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे घणाघाती टीका पाटील यांनी केली. ते म्हणाले केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यातही भाजप मजबूत आहे. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. संघटना मजबूत आहे, तर मग पक्ष फोडण्याचा खटाटोप कशासाठी? भाजपने स्वतःचे घर सांभाळावे असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

भाजप विरोधकांची मूट बांधून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. मात्र, भाजपच्या मनात भीती आहे, त्यामुळेच निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याची टीका पाटील यांनी केली. जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा फुगा फुटणार आहे, असही ते म्हणाले.

Unmesh Patil & Girish Mahajan
Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate : जिल्हा बॅंकेवरुन भुजबळ-कोकोटे यांच्यात जरा जास्तच पेटलंय, कोण मागे हटणार?

आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटन मजबूत करुन प्रत्येक प्रभाग व शाखा मजबुत करा अशा सूचना त्यांनी बैठकीत उपस्थित नेत्यांना दिल्या. यावेळी बैठकीला शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, महापालिका सभागृहातील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक खालिद बागवान, जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे महानगर प्रमुख जाकीर पठाण, युवा सेना जिल्हा प्रमुख पीयूष गांधी, अशोक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Unmesh Patil & Girish Mahajan
Raj Thackeray Nashik : राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडलं 'लकी' नाशिक, ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता..

दरम्यान या बैठकीकडे काही माजी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. माजी महापौर जयश्री महाजन या बैठकीला अनुपस्थित होत्या, तर त्यांचे पती सुनील महाजन यांनी मात्र या बैठकीत हजेरी लावली होती. पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून असेच चित्र आहे. पक्षाच्या बैठकांना व मेळाव्यांना माजी नगरसेवक उपस्थित राहत नाही. माजी महापौर नितीन लढा, प्रशांत नाईक, राखी सोनवणे, नितीन बरडे, अनंत जोशी यांच्यासह इतर माजी नगरसेवक पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com