
Nashik News : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यातील एकजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच संशयितांकडून गावठी बंदूका जप्त करण्यात आल्या आहेत.
9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर, वरणगाव येथील तीन पेट्रोल पंपांवर दरोडा पडला होता. मुक्ताईनगरात राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फ्युएल्स या पेट्रोलपंपावरही हा दरोडा पडला. 1 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी पळवली होती. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून व मारहाण करत तेथील सीसीटीव्हींची या दरोडेखोरांनी तोडफोड केली होती.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोलपंप असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. त्यासाठी जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे नाशिक व अकोला येथे छापे टाकून सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल व देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित मुलाला अटक केली. सध्या सर्व आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
काय घडलं होतं ?
पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला. पाच दरोडेखोर मोटरसायकलवरून पेट्रोलपंपावर आले. यावेळी या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील सुमारे एक लाख रुपयांची रोकड लुटून नेली. यावेळीचोरट्यांनी पंपावरील सीसीटीव्हीची तोडफोड केली होती.
खडसेंनी केला हल्लाबोल
दरम्यान जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या दरोड्यावरुन प्रशासनावर जोरदार टीका केली होती. केंद्रीय राज्य मंत्र्यांचीच मालमत्ता सुरक्षित नाही तेव्हा सामन्यांचे काय असा हल्लाबोल पोलिस यंत्रणेवर खडसेंनी केला होता. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात गावठी बंदुका, अमली पदार्थ, शस्त्रे आढळून आली आहेत. असले प्रकार संबंधित गुन्हेगारांना कोणाचे तरी राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाढूच शकत नाही असा आरोप खडसेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.