

Jalgaon RSS path sanchalan stone pelting case : जळगावमधील किनगावात सध्या चांगलात तणाव निर्माण झाला आहे. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे काढण्यात आलेल्या पथसंचलना परवानगी असताना विरोध करण्यात आला. प्रकरण इतके वाढले की थेट पोलिसांवर दगडफेक झाली.
या दगडफेकीमध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हल्ला दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे.
नेमकं घडलं काय ?
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त पथसंचालनाचा उपक्रम याच वर्षी सुरू करण्यात आला. पथसंचलन एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यास काही महिला आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत हिय्या आंदोलन केले. या वेळी दोन्ही गटांत बाचाबाची झाल्यावर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत चार ते पाच पोलिस जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकी प्रकरणात सुमारे 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या गावात परिस्थिती नियंत्रणात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता, शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून रात्री किनगावमध्ये भेट देत पाहणी करण्यात आली आहे.
अजिबात खपवून घेणार नाही : गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारे मिरवणुकीला विरोध करणे किंवा दगडफेक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही, तसा प्रयत्न करू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.