Unmesh Patil cheating case : ठाकरेच्या शिलेदाराला कुठल्याही क्षणी अटक होणार? उन्मेष पाटलांसह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Cheating Case Filed Against Former Shiv SenaUBT MP Unmesh Patil and Four Others in Jalgaon : जळगावमधील देवगिरी नागरी सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Unmesh Patil cheating case
Unmesh Patil cheating caseSarkarnama
Published on
Updated on

fraud case against Unmesh Patil : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जळगावमधील माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चौघा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमंग व्हाईट गोल्ड कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल करण्यात झाला असून, बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा उन्मेष पाटील यांनी केला.

माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले, "देवगिरी बँकेने (Bank) राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला. बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आलं आहे."

'मी या कंपनीचा कुठलाही भाग नसताना राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मला विचारायचं आहे, पार्थ पवार 99% भागीदार तिथे गुन्हा दाखल होत नाही. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कुटुंबाच्या नावाने बीएचआरचे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून वस्तू माफक दरात खरेदी केला जातात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही,' असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला.

Unmesh Patil cheating case
OBC quota : खबरदार! आरक्षणाच्या मूळ जागेवर डावलल्यास; सर्व पक्षातील 'OBC' पदाधिकाऱ्यांची बैठक, मतदानातून उत्तर देणार

'वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? वरद इन्फ्राला तीन-चार कोटीच्या व्हॅल्युएशन असलेल्या ॲसेट आधारावर याच बँकेने 12 कोटीचे कर्ज दिले त्यावर गुन्हा दाखल होत नाही. मी जामीनदार होतो कर्जाच्या पाचपट माझ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहेत. कर्जाच्या 10% व्हॅल्युएशन नसणाऱ्यांना दहापट कर्ज दिले जातं देवाभाऊ हा न्याय कुठला?,' असा प्रश्न उन्मेष पाटील यांनी केला आहे.

Unmesh Patil cheating case
Nashik NMC Election : गिरीश महाजनांच्या कृपेने भाजपात कमबॅक, त्याच गणेश गितेंचा डावही यशस्वी : आरक्षणानंतर पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

उन्मेष पाटील यांची मागणी

जेव्हा मी 'बीएचआर'वर बोलतो, तेव्हा यांना झोंबत आणि तीन दिवसात माझ्यावर गुन्हा दाखल होतो. इतक्या महिन्यांपासून माझ्यावर गुन्हा दाखल का झालं नाही? तीनच दिवसात पुन्हा कसा दाखल झाला? मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी, बँकेचे मॅनेजर, रिकरवी ऑफिसर यांचे CDR तपासण्याची मागणी उन्मेष पाटील यांनी केली.

सर्व काही सर्वश्रुत

'सर्वश्रुत आहे, मंगेश चव्हाण भाजपचे आमदार, गिरीश महाजन भाजपचे मंत्री, देवगिरी बँकेचे चेअरमन भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहे. म्हणून निवडणूक जवळ आली, मी बोलायला लागलो, तीन दिवसात जो अनेक महिन्यात गुन्हा नव्हता तो गुन्हा होतो, ही यांचे नीती आहे का? भाजपशी माझा वाद आणि वैर नव्हतं, भाजपतील या प्रवृत्ती विरोधात माझा लढा होता. ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न होती, एकनाथ खडसे, सुरेश जैन यांना या प्रवृत्तीनेच काढले. या प्रवृत्ती विरोधात मी होतो, यांच्यासोबत मी काम करू शकत नव्हतो,' असे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.

प्रवृत्तीला गाडणार

'जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत', अडथळे ताकद निर्माण करतात. जेवढे अडथळे आणतील तेवढे ताकद माझ्यात येईल, या प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढू आणि यांना गाडू. काही झालं तरी उन्मेष पाटील थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com