जळगाव : महापालिकेत (Jalgaon) भारतीय जनता पक्षातून (BJP) फुटून २७ नगरसेवकांनी शिवसेनेला (Shivsena) सत्तेसाठी साथ दिली होती. त्यामुळे शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आली. पाठिंबा देणाऱ्या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. (Shivsena split in jalgaon municiple corporation)
ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिली फूट आहे.
जळगाव महापालिकेत भाजपतून फुटून शिवसेनेला पाठिंबा देणारे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, रेश्मा काळे, चेतन सनकत व कार्यकर्ता हर्षल मावळे यांनी बुधवारी (ता. २९) एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यांनी ठाणे येथे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. आपला पाठिंबा एकनाथ शिंदे यांना असल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरी उपस्थित होते.
नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्या वेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही आज सहा नगरसेवक असलो तरी फुटीर गटासह अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली, आमच्यावर अपात्रतेची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आताही यापुढे आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली. त्यावर खासदार शिंदे यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.
शिंदे, गुलाबराव पाटलांशी चर्चा
एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांच्याशीही फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दारकुंडे यांनी दिली. ते म्हणाले, की गुलाबराव पाटील यांनी आपल्या अपात्रतेच्या बाबतीत आपण एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत, तसेच आपण स्वत: लक्ष देणार आहोत. दोन दिवस आपण मुंबईत थांबत असाल तर आपण भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.