Rohit Pawar Jamkhed municipal election : पराभवाचा 'ब्लेम गेम'; पवार-सपकाळ-थोरातांमध्ये रंगलाय!

Jamkhed Municipal Election Defeat: Rohit Pawar, Congress Leaders in Blame Game : जामखेड नगरपालिकेत शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पराभवाचा धक्का बसला असून, त्यावर महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे.
Rohit Pawar Jamkhed
Rohit Pawar JamkhedSarkarnama
Published on
Updated on

Jamkhed municipal election : जामखेड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पराभवाचा धक्का बसला आहे. स्थानिक पातळीवरची ही निवडणूक असली, तरी भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील ही लढाई होती. त्यामुळे इथली निवडणूक प्रतिष्ठेची झाली.

पराभवानंतर रोहित पवारांनी काँग्रेसला भाजपची-बी टिम म्हणून ब्लेम केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या या ब्लेमवर संयमाने, तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कान टोचणारी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, एक्सवर पोस्ट करताना, काँग्रेसच्या दिशेने बोट करताना, काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला, असा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या या तिरक्या चालीला लोकं देखील बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे, असे म्हटले.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या या आरोपावर संयम ठेवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'जामखेडमध्ये आघाडीत दोन्ही पक्ष लढणे आवश्यक होते. मात्र चर्चा शेवटपर्यंत गेली नाही. दोघांनाही समजून घेण्यात संवादाचा अभाव राहिला असेल, त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. आगामी काळात आघाडीच्या अनुषंगाने प्रयत्न राहील. जामखेडमध्ये रोहित पवारांचे चांगले काम आहे. महाविकास आघाडीचे ते जबाबदार नेते आहेत. आगामी काळात त्यांना सहकार्याची भूमिका काँग्रेसची राहील.'

Rohit Pawar Jamkhed
Sangamner railway meeting : तीन खासदार, दोन माजी खासदार, चार आमदार अन् भरगच्च बैठकीतून सत्यजीत तांबेंचा मुख्यमंत्र्यांना फोन!

बाळासाहेब थोरात आज अहिल्यानगर शहर दौऱ्यावर होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जामखेड संदर्भात मी पवारांना सांगितलं होते की स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा. मात्र विधानसभा निवडणुकीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर निवडणुकांना सामोरे जाताना आपले मुद्दे बाजूला ठेवावे लागतात, तडजोड करावी लागते, असा माझा आग्रह होता. मात्र त्यांनी माझा देखील आग्रह मान्य केला नाही."

Rohit Pawar Jamkhed
Drug trafficking in Sangamner : 'अमली पदार्थांच्या साखळीमागे बेकायदेशीर टोल वसुली'; थोरात संगमनेरमध्ये 'साफसफाई'च्या तयारीत!

'जामखेड निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते कमी पडले असतील. पण कार्यकर्ता आहे, त्याला संभाळणे नेत्याचे काम आहे. काँग्रेसचे नेते म्हणून आम्ही स्थानिक मंडळींबरोबर आहे,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

विधिमंडळापर्यंत गाजली निवडणूक

जामखेड नगरपालिकेत एकूण 24 जागांपैकी भाजपने 15, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाच, एकनाथ शिंदे शिवसेनेने एक, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक आणि वंचित बहुजन आघाडीने पहिल्यादांच दोन जागा जिंकल्या आहेत. ही निवडणूक एवढी गाजली होती की, आमदार पवार यांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग देखी दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com