

Sangamner political news : संगमनेर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा पुरता धुव्वा उडवल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 'अॅक्शन मोडवर' आले आहेत. 'संगमनेरमधील अमली पदार्थांची तस्करी अन् त्यामागील टोल वसुली, गुंडगिरी, दहशतीवर तुटून पडले. संगमनेर शहर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी साफसफाईची मोहीम सुरू केली आहे,' असा इशारा दिला.
बाळासाहेब थोरात यांची ही आक्रमक भूमिका, आगामी काळात सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्षाची तयारी ठेवल्याचे संकेत आहेत. नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची देखील थोरातांनी तयारीत आहेत. होम ग्राऊंडवरची निवडणूक जिंकल्यानंतर, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीत पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत थोरातांनी दिले आहेत.
संगमनेर (Sangamner) नगरपालिका निवडणुकीत डॉ. मैथिली तांबे नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या. यानिमित्त संगमनेरमध्ये विजयी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत थोरातांची आक्रमक शैली पाहायला मिळाली. ते म्हणाले, "संगमनेरने आजवर विकास, स्वच्छता आणि सामाजिक सलोख्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु अलीकडच्या काळात काही समाजकंटकांकडून अमली पदार्थांचा खुलेआम व्यवहार सुरू असून त्याचा थेट दुष्परिणाम नवीन पिढीवर होत आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे."
बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) गंभीर आरोप केला, अमली पदार्थांच्या या साखळीमागे बेकायदेशीर टोल वसुली आणि अवैध आर्थिक व्यवहार आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद झाले पाहिजेत. अन्यथा शहरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येईल. आपण अशा प्रकारे संगमनेरची बदनामी होऊ देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याच विषयावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मागील वर्षभरात संगमनेर शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि हप्तेखोरी वाढली आहे. याविरोधात मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे हा विजय आम्ही जनतेला समर्पित करतो.
एकूणच, संगमनेरमध्ये वाढत असलेली अमली पदार्थांची तस्करी, गुंडगिरी आणि दहशत यावर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक असून, शहराची विकासाची व शांततेची ओळख कायम राखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा विजयी रॅलीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.